क्रिकेट सोडलं पण पैसा नाही! इरफान पठाणच्या कमाईचा भन्नाट फॉर्म्युला

इरफान पठाणने 2004 मध्ये त्यांच्या क्रिकेट करिअरची सुरुवात धमाकेदार पद्धतीने केली होती. तसेच इरफान पठाण यांची गोलंदाजी जरा अवघड पद्धतीची असल्यामुळे त्यांना खेळताना कधी त्रास व्हायचा. इरफान पठाण भारतीय संघाचा असा एकमेव गोलंदाज आहेत, ज्यांनी पहिल्याच षटकारात हॅट्रिक घेतलेली आहे. इरफान पठाण यांनी भारतीय संघासाठी 29 कसोटी सामने 120 वनडे सामने आणि 24 टी20 इंटरनॅशनल सामने खेळले आहेत. इरफान पठाण 2007 मध्ये टी20 वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचे खेळाडू राहिले आहेत.

इरफान पठाण यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांना बीसीसीआय कडून चांगली पेन्शन भेटते. मीडिया रिपोर्टनुसार इरफान पठाण यांना बीसीसीआय कडून प्रत्येक महिन्याला 60 हजार रुपयांची पेन्शन मिळते.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नियमानुसार जर कोणता क्रिकेटर भारतासाठी पाच किंवा त्यापेक्षा जास्त कसोटी सामने खेळत असेल तर त्या क्रिकेटरला निवृत्तीनंतर प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळते.

इरफान पठाणने भारतासाठी 29 कसोटी सामन्यांमध्ये 100 विकेट्स , 120 वनडे सामन्यांमध्ये 173 विकेट्स, आणि 24 टी20 इंटरनॅशनल सामन्यांमध्ये 28 विकेट्स घेतल्या आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार इरफान पठाण यांची पूर्ण प्रॉपर्टी एकूणच 60 करोड रुपये इतकी आहे. वडोदरामध्ये इरफान पठाण यांचं आलिशान घर आहे, ज्याची किंमत 60 करोड रुपये इतकी आहे. तसेच इरफान पठाण यांच्याकडे मर्सिडीज बेंज, महिंद्रा स्कार्पियो आणि टोयोटा फॉर्च्यूनर अशा शानदार गाड्या आहेत. त्याचबरोबर इरफान पठाण यांना कॉमेंट्री मधूनही चांगली रक्कम मिळते.

इरफान पठाण यांची पत्नी सफा बेग खूप सुंदर आहे. सफा बेग आणि इरफानच्या मुलाखती बद्दल अधिक माहिती मिळाली नाही. पण म्हटलं जातं की यांची भेट 2014 मध्ये दुबई मध्ये झाली होती. त्यानंतर 2016 मध्ये दोघांनी विवाह केला होता. सफा बेग पूर्व आशिया मधील एक मोठी मॉडेल आहे. त्यांचे फोटो तेथील मोठ्या फॅशन मॅगझिन्स मध्ये छापले होते. सफा बेग यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1994 रोजी झाला होता आणि इरफान पेक्षा त्या दहा वर्षांनी लहान आहेत.

हेही वाचा

रणजी फायनलमध्ये करुण नायरचा जलवा, दमदार शतकाने विदर्भ जेतेपदाच्या उंबरठ्यावर!

दक्षिण आफ्रिकेची विजयी झेप! आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 उपांत्य फेरीत दणदणीत प्रवेश

SA vs ENG: इंग्लंडची दुर्दशा, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी उडवला धुव्वा, 179 धावांत सर्वबाद

Comments are closed.