Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 03 March 2025 : ABP Majha
Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 03 March 2025 : ABP Majha
आजपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन.अधिवेशनात अनेक मुद्द्यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत.
शिवसेनेकडून विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विरोधी पक्षनेत्यांसंदर्भात पत्र दिले जाण्याची शक्यता. सर्वाधिक जागा शिवसेनेच्या असल्याने विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा,
विरोधी पक्षनेता निवडीसाठी खास तरतूद नाही. विधिमंडळ सचिवांचं ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांना प्रत्युत्तर. जाधवांनी २५ नोव्हेंबरला मागितली होती तरतुदींची माहिती.
चहापानाच्या कार्यक्रमावेळी अजित पवारांनी धनंजय मुंडेंशी बोलणं टाळलं, धनंजय मुंडेंवर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा.
संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज धनंजय मुंडे राजीनामा देणार, करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट. दोन दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचा राजीनामा लिहून घेतला, करुणा मुंडेंच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चांना उधाण.
आजपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांची रणनीती, कोकाटे आणि मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक होणार.
Comments are closed.