Rohit pawar attack on cm devendra fadnavis over prashant koratkar and rahul solapurkar
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे यांचा अपमान करणाऱ्यांना महायुती सरकार संरक्षण आणि पुरस्कार देत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली. राज्याचे अर्थसंकल्यीय अधिवेशन आजपासून सुरु झाले. विधिमडंळ परिसराच्या आवारात माध्यमांसोबत बोलताना आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री यांनी काल (रविवार) केलेल्या दाव्यांवर सडकून टीका केली. शिवाजी महाराजांचा अपमान करणारा राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यावर अद्याप कारवाई का झाली नाही, असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. त्यांच्याबद्दल कोणीही चुकीचा शब्द, अपशब्दांचा वापर केला, त्यांचा अपमान केला तर तो सहन केला जाणार नाही. जो कोणी शिवाजी महाराजांबद्दल चुकीच्या पद्धतीने बोलणार त्याच्यावर कारवाई करणार. असे जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत असतील तर अभिनेता राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय खालच्या स्तराला जाऊन वक्तव्य केलं. त्याला दोन दिवसांपूर्वी पुणे सांस्कृतिक समितीवर घेण्यात आले, असे सांगत रोहित पवार म्हणाले की, महापुरुषांच्याविरोधात बोलणाऱ्यांवर आम्ही कारवाई करणार असे मुख्यमंत्री सांगतात आणि शिवाजी महाराजांबद्दल खालच्या स्तरावर जाऊन बोलणाऱ्याचा एक प्रकारे सत्कार केला जातो. त्याची सरकारी समितीवर नियुक्ती केली जाते, असा आरोप रोहित पवार यांनी केला.
प्रशांत कोरटकर पोलीस संरक्षणात गायब झाला का?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाची दुसरी घटना नागपूरमधील प्रशांत कोरटकर करतो. शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याबद्दल खालच्या पातळीवर टीका करतो. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देतो. तो आता मध्यप्रदेशमध्ये जाऊन लपला आहे. त्याला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. पोलिस संरक्षणात तो गायब झाला का, असा संतप्त सवाल आमदार रोहित पवार यांनी केला. ईडी आणि सीबीआयने जप्त केलेल्या आलिशान गाड्या हा कोरटकर वापरतो. तो भाजपचा कार्यकर्ता आहे, असाही आरोप रोहित पवार यांनी केला.
एकीकडे आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे शिवाजी महाराज, संभाजी राजे यांचा अपमान करणाऱ्यांना पोलीस संरक्षण द्यायचे, असा दुटप्पी कारभार या सरकारचा सुरु आहे. केवळ हास्यविनोदाची कालची पत्रकार परिषद होती, असा टोलाही त्यांनी लगावला.
प्रचंड बहुमतानंतर सरकारमध्ये समन्वयाचा आभाव
विरोधी पक्षात एकमत नाही, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत केला होता, त्यावर पलटवार करताना रोहित पवार म्हणाले की, सरकारला एवढे मोठे बहुमत मिळाल्यानंतरही सरकारमध्ये समन्वय दिसत नाही. दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री अजून निवडले गेले नाही. विकास कामांवर सरकार अजुनही बोलत नाही, असाही आरोप आमदार पवार यांनी केला.
हेही वाचा : Rohini Khadse : केंद्रीय मंत्र्याची मुलगी सुरक्षीत नसेल तर…; महिलांना सुरक्षा देण्यासाठी गृह खाते अपयशी
Comments are closed.