IPL 2025 : शाहरुख खानच्या Kolkata Knight Ridersसंघाचा कर्णधार ठरला, मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे
कोलकाता नाइट रायडर्स कॅप्टन म्हणून नियुक्त अजिंक्य राहणे: यंदाचा आयपीएलचा हंगाम अगदी तोंडावर आला आहे. यावेळी काहीही झालं तरी ट्रॉफीवर नाव कोरायचंच अशी जिद्द बाळगून सर्वच संघ मैदानात उतरणार आहेत. येत्या 22 मार्चपासून आयपीओलचा थरार सुरू होणार आहे. याआधीच आयपीएल स्पर्धेतील महत्त्वाच्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) या संघाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. या संघाने आपला कर्णधार ठरवला आहे. तशी अधिकृत घोषणाच या संघाने केली आहे.
मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे नेतृत्त्व
अभिनेता शाहरुख खान याच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स या संघाचे नेतृत्त्व आता मराठमोळा क्रिकेटर अजिंक्य राहणे याच्याकडे सोपवण्यात आले आहे. तशी अधिकृत घोषणा केकेआर या संघाने केली आहे.
𝕂 रात्री. 𝕂aptain. ℝहाने. pic.twitter.com/afi1hhyhed
– कोलकातकनाइटर्स (@kkriders) 3 मार्च, 2025
व्यंकटेश अय्यरकडे उपकर्णधारपद
कोलकाता नाईट रायडर्स संघाचे उपकर्णधापद व्यंकटेश अय्यरकडे सोपवण्यात आले आहे. 2025 सालच्या संपूर्ण हंगामासाठी त्याच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केकेआर संघाचे सीईओ व्यंकी मैसूर यांनी तशी घोषणा केली आहे.
संघाचे नेतृत्व आल्यानंतर अजिंक्य काय म्हणाला?
कोलकाता संघाचे कर्णधारपद मिळाल्यानंतर अजिंक्य राहणे याने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. “केकेआर संघाचे नेतृत्व करण्यासाठी विचारणा होणे, हीच फार अभिमानाची बाब आहे. केकेआर हा संघ आपयीएलच्या इतिहासात सर्वाधिक यशस्वी संघांपैकी एख आहे. मला वाटतं आमच्या टीममध्ये सर्व प्रकारचे खेळाडू आहेत. आमचा संघ हा उत्कृष्ट आहे. मी प्रत्येकासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे,” असे अजिंक्य राहणे याने म्हटले आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा पहिला सामना 22 मार्च रोजी
दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्स हा संघ या हंगामाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 22 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाविरोधात लढणार आहे. त्यामुळे या पहिल्याच सामन्यात नेमकं काय होणार? कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
अधिक पाहा..
Comments are closed.