रिषभ पंतचा जागतिक सन्मान.! 'लॉरेस कमबॅक ऑफ द इयर'साठी नामांकन
भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतला ‘लॉरेस वर्ल्ड कमबॅक ऑफ द इयर’ पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. हा पुरस्कार अशा खेळाडूंना दिला जातो. ज्यांनी गंभीर अडचणींवर मात करून खेळात शानदार पुनरागमन केले आहे. पंतने 2022 साली झालेल्या भयानक कार अपघातानंतर जवळपास एक वर्ष क्रिकेटपासून दूर राहावे लागले. मात्र, त्याने अपघातातून पुनरागमन करत भारतीय क्रिकेटमध्ये पुनश्च जोरदार कमबॅक केला.
लॉरेस पुरस्कारांसाठी नामांकन मिळवणारा रिषभ पंत हा सचिन तेंडुलकरनंतर दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. 2020 मध्ये सचिन तेंडुलकरला “लॉरेस स्पोर्टिंग मोमेंट ऑफ द इयर” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्या आधी कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूला लॉरेस पुरस्काराच्या नामांकनाची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे पंतचे नाव यासाठी समोर आल्याने भारतीय क्रीडाजगतात आनंदाचे वातावरण आहे.
लॉरियस अवॉर्ड्ससाठी नामांकित ish षभ पंत 📢
पॅन्टला लॉरेस कमबॅक ऑफ द इयर अवॉर्ड श्रेणीसाठी नामांकन देण्यात आले आहे.
देशातील अभिमानाचा क्षण सचिन तेंडुलकर नंतर लॉरियस पुरस्कारासाठी नामांकित करणारा पंत हा एकमेव दुसरा क्रिकेटर आहे. 🇮🇳 pic.twitter.com/f4j9efebxo
– जॉन्स. (@Criccrazyjhons) 3 मार्च, 2025
डिसेंबर 2022 मध्ये पंतच्या कारला भीषण अपघात झाला. ज्यामध्ये त्याला अनेक गंभीर दुखापती झाल्या. त्याच्या गुडघ्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली आणि तज्ञांच्या मते त्याला पुनरागमन करायला किमान दोन वर्षे लागू शकली असती. मात्र, पंतने जिद्दीने पुनर्वसन पूर्ण केले आणि 2024 च्या आयपीएलपूर्वी तो पुनरागमन करण्यास तयार झाला.
लॉरेस पुरस्कार हे “स्पोर्ट्सचा ऑस्कर” म्हणून ओळखले जातात. जगभरातील वेगवेगळ्या खेळांमधील सर्वोत्तम खेळाडू आणि संघ यांना या पुरस्काराने गौरवले जाते. त्यामुळे क्रिकेटसारख्या मर्यादित जागतिक व्याप्ती असलेल्या खेळातील एका भारतीय खेळाडूला हे नामांकन मिळणे, ही अभिमानाची बाब आहे.
लॉरेस कमबॅक ऑफ द इयर पुरस्कार म्हणजे काय?
हा पुरस्कार अशा खेळाडूंना दिला जातो, ज्यांनी कारकीर्द धोक्यात आलेली असताना मोठ्या जिद्दीने पुनरागमन करून सर्वोच्च स्तरावर आपली छाप पाडली. रिषभ पंतसोबत या पुरस्कारासाठी इतर काही आंतरराष्ट्रीय खेळाडूंचीही नावे नामांकनात आहेत. विजेत्याची घोषणा पुढील काही आठवड्यांत केली जाईल.
रिषभ पंतच्या पुनरागमनाने भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. त्याच्या कष्ट, जिद्द आणि क्रिकेटमधील योगदानामुळे त्याला हे नामांकन मिळाले आहे. आता तो हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकतो का, याकडे संपूर्ण भारताचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध के. एल. राहुलला विश्रांती? ऋषभ पंतला संधी मिळण्याची चर्चा जोरात
थोडक्यात हुकला ऐतिहासिक वर्ल्ड रेकॉर्ड, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाच्या हातून संधी निसटली!
Comments are closed.