Shaktipeeth Expressway will be built governor mentioned in maharashtra assembly session key note address in marathi


नागपूर ते गोवा दरम्यानच्या शक्तिपीठ द्रुतगती मार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध असताना सरकारने या मार्गाचे बांधकाम हाती घेतल्याचे राज्यपाल राधाकृष्णन यांनी अभिभाषणात म्हटले आहे.

Governor CP Radhakrishnan On Shaktipeeth Mahamarg : मुंबई : नागपूर ते गोवा दरम्यानच्या शक्तिपीठ द्रुतगती मार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध असताना सरकारने या मार्गाचे बांधकाम हाती घेतल्याचे राज्यपाल राधाकृष्णन यांनी अभिभाषणात म्हटले आहे. सर्वांना विश्वासात घेऊन हा द्रुतगती मार्ग पूर्ण करण्यात येईल. या मार्गामुळे प्रमुख धार्मिक क्षेत्रे आणि तीर्थक्षेत्रे जोडण्यात येतील. या मार्गामुळे केवळ प्रवासाचा वेळ कमी होणार नाही तर या प्रदेशातील आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात व्यक्त केला. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 86 हजार 300 कोटी रुपये असल्याची माहितीही त्यांनी दिली. (Shaktipeeth Expressway will be built governor mentioned in maharashtra assembly session key note address)

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात सोमवार, 3 मार्च रोजी राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. विधिमंडळाच्या संयुक्त बैठकीत राज्यपालांनी राज्य सरकारच्या गेल्या वर्षभरातील योजनांचा लेखाजोखा मांडला. आपल्या भाषणात त्यांनी शेतकरी, महिला, समाजातील दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी त्याचसोबत आरोग्य, रोजगार,उद्योग,पायाभूत सोयी सुविधांच्या बळकटीकरणास सरकारचे प्राधान्य असल्याचे सांगितले. राज्य सरकार सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी काम करीत असल्याचे राज्यपालांनी आपल्या भाषणात नमूद केले.

हेही वाचा – Assembly Session 2025 : विधानसभा उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, अजित पवारांकडून या नावावर शिक्कामोर्तब?

राज्यात 15 लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी

राज्य सरकारने जानेवारी 2025 मध्ये दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी सुमारे 15 लाख 72 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामुळे राज्यात 15 लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्मण होतील, असा विश्वास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सोमवारी येथे व्यक्त केला. राज्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी तसेच रोजगाराच्या संधीसाठी राज्यातील विविध उद्योगांना प्रोत्साहन अनुदान म्हणून पाच हजार कोटी रुपये वितरित करण्याची योजना आखल्याचेही राधाकृष्णन यांनी सांगितले.

सीमाप्रश्न सोडविण्यासाठी वचनबद्ध

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तज्ज्ञ वकिलांची नियुक्ती केली आहे. राज्य सरकार सीमावर्ती भागामध्ये राहणाऱ्या मराठी भाषिक जनतेसाठी शैक्षणिक, वैद्यकीय आणि इतर विविध कल्याणकारी योजना राबवित असल्याचे राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितले.

हेही वाचा – Shama Mohamed : कोण आहेत शमा मोहम्मद? रोहित शर्मावरील विधानामुळे आल्या चर्चेत



Source link

Comments are closed.