आधी इम्रान हाश्मीसोबत भरभरुन किसिंग सीन, पुढे क्रिकेटच्या ‘या’ माजी किंगसोबत थाटला संसार
हरभजनसिंग लव्ह स्टोरी: टीम इंडियाच्या क्रिकेट टीममधील अनेक खेळाडूंनी बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्न करत संसार थाटलाय. बॉलिवूड आणि भारतीय क्रिकेट टीम हा प्रेमाचा अँगल काही भारतीय लोकांना नवा नाही. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्या समालोचक म्हणून काम करत असलेला हरभजन सिंग देखील यापासून दूर राहिलेला नाही. हरभजन सिंगने 2015 साली बॉलिवूड अभिनेत्री गीता बासरा हिच्याशी विवाह केला होता. विवाह होण्यापूर्वी गीता बासरा सिनेसृष्टीत काम करत होती. त्यावेळीच तिचा जीव भारताचा हरभजन सिंगमध्ये गुंतला होता. जाणून घेऊयात हरभजन सिंग आणि गीता बासरा यांच्या लवस्टोरीबाबत….
हरभजनने प्रपोज केलं पण गीताला चिंता होती करियरची
टीम इंडियाने 2007 चा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर गीता बासराने हरभजन सिंगला फोन केला होता. यावेळी टीम इंडियाने मिळवलेल्या दणदणीत विजयाबद्दल गीताने हरभजन सिंगचं अभिनंदन केलं होतं. त्यानंतर हरभजनने गीताला आयपीएलचे सामने पाहण्यासाठी सांगितलं होतं. मात्र, गीता त्यावेळी सामना पाहण्यासाठी उपस्थित राहिली नव्हती. मात्र, त्यानंतर हरभजन आणि गीता बासरा यांची जवळीक वाढलेली पाहायला मिळाली. हरभजनने प्रपोज केल्यानंतर गीता होकार देण्यासाठी तयार नव्हती. गीताला तिच्या करियरची चिंता वाटत होती.
हरभजन सिंग आणि गीता बासरा 2015 साली विवाह
मात्र, काही महिन्यांनंतर गीताला वाटलं की, हरभजन सारखा जोडीदार आपल्याल कधी मिळणार नाही. मग काय तिने भज्जीशी 2015 साली विवाह उरकून घेतला. हरभजन सिंग आणि गीता बासराने 2015 साली विवाह केला होता. गीता बासराचा जन्म लंडनमध्ये झाला होता. एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की, हरभजन सोबतच्या रिलेशनशिपमध्ये अडकल्याने मी संशयित आणि चिंतेत होते. कारण मी क्रिकेटमधील खेळाडूंबाबत अनेक अफवा ऐकल्या होत्या.
गीता बासराने बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये काम केलंय. तिने द ट्रेन या सिनेमात गीता बासराने इम्रान हाश्मीसोबत भरभरुन किसिंग सीन दिले होते. इम्रानसोबत तिने या सिनेमात अनेक रोमांटिक सीन देखील दिले होते. तिने बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमे केले आहेत. द ट्रेन हा सिनेमा 2006 साली रिलीज झाला होता. बासराने बॉलिवूडमधील 10 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलंय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
कोण आहे पश्मिना रोशन जिची एक झलक पाहण्यासाठी तरुणांची धडपड, ऋतिक रोशनशी नेमकं नातं काय?
अधिक पाहा..
Comments are closed.