Manoj Jarange patil admitted in galaxy hospital chh sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर – मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना तत्काळ अंतरवाली सराटी येथून छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गॅलक्सी हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सतत सुरू असलेल्या उपोषणामुळे त्यांची तब्येत खालवल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
आज सकाळी काही कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले. यावेळी जरांगे पाटील यांना त्यांच्यासमोरच भोवळ आली. या कार्यकर्त्यांनी त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल केले. सततचं उपोषण आणि दौरे यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. गेली काही दिवस मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासह अन्य मागण्यासाठी अनेकदा बेमुदत उपोषण केले होते. या उपोषणाचा त्यांच्या शरीरावर परिणाम झाल्याने त्यांची तब्येत अचानक बिघडली आहे.
हेही वाचा : Maharashtra Assembly Polls : मी थोड्याच दिवसांचा पाहुणा… ; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे असं का म्हणाले
लक्ष्मण हाकेंचे मनोज जरांगेंना सल्ला
मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्याता आल्यानंतर त्यांचे राजकीय विरोधक लक्ष्मण हाके यांनी त्यांना यापुढे उपोषण न करण्याचा सल्ला दिला आहे. लक्ष्मण हाके म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी आता तब्येतीकडे लक्ष द्यावे. व्यवस्थित जेवण करावे आणि यापुढे उपोषण करणे टाळावे. असा सल्ला ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. सलाईन पेक्षा चांगला आहार घ्या, चांगले उपचार करा, अन्यथा पुन्हा प्रकृती बिघडेल असाही सल्ला लक्ष्मण हाके यांनी दिला.
हेही वाचा : Election : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर, कोणाची लागणार वर्णी याकडे लक्ष
Comments are closed.