पहिल्या सेमीफायनलमध्ये कोण मारणार बाजी? भारत की ऑस्ट्रेलिया? माजी क्रिकेटपटूची मोठी भविष्यवाणी

सध्याची आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दरम्यान या मेगा स्पर्धेतील पहिला सेमीफायनल सामना भारत-ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात रंगणार आहे. दरम्यान दोन्ही संघ उद्या (4 मार्च) दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आमने-सामने असणार आहेत.

सामन्याच्या एक दिवस आधी, भारतीय दिग्गज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी एक मोठे विधान केले. त्यांनी या सामन्याबद्दल मोठी भविष्यवाणी केली. या सामन्यात भारतीय संघ सर्वात फेव्हरेट आहे असे गावस्कर मानतात. या स्पर्धेत भारत आतापर्यंत अपराजित राहिला आहे. भारताने गट फेरीत बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडला धूळ चारली.

दुबईची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी स्वर्ग ठरली आहे आणि गावस्कर यांना वाटते की (4 मार्च) रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताला बाजी मारता येईल. न्यूझीलंडविरुद्धच्या भारताच्या विजयानंतर इंडिया टुडेशी बोलताना गावस्कर म्हणाले की, “ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांमध्ये फारशी ताकद नाही. त्यांना पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क सारख्या महत्त्वाच्या खेळाडूंची उणीव भासत आहे. भारतासाठी आदर्श गोष्ट म्हणजे सेमीफायनलमध्ये धावांचा पाठलाग करणे.”

आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी दोन्ही संघ-

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वरूण चक्रवर्ती

ऑस्ट्रेलिया- स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अ‍ॅबॉट, अ‍ॅलेक्स केरी, बेन द्वारशुइस, नाथन इलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, कूपर कॉनोली, अ‍ॅडम झाम्पा

महत्त्वाच्या बातम्या-

सेमीफायनल सामन्यासाठी ऑन-फिल्ड अंपायर्सची नावे जाहीर, थर्ड अंपायर म्हणून मायकेल गॉफची निवड
दुबई आमचं घर नाही, टीकाकारांना प्रत्युत्तर देताना काय म्हणाला रोहित शर्मा?
रोहित शर्माला ‘जाड’ म्हणण्यावरून वादंग, BJP ची टीका – “राहुल गांधीच अनफिट!”

Comments are closed.