Vidhan Parishad Elections for five vacant seats of the Legislative Council on March 27


गतवर्षी विधान परिषदेच्या सात जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत महायुतीने विजय मिळवला. आता उर्वरित पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानुसार, गुरूवार 27 मार्च रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे.

मुंबई : गतवर्षी विधान परिषदेच्या सात जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत महायुतीने विजय मिळवला. आता उर्वरित पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानुसार, गुरूवार 27 मार्च रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. आता या निवडणुकीत कोणाल संधी मिळते आणि कोणाचा विजय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Vidhan Parishad Elections for five vacant seats of the Legislative Council on March 27)

विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम

  • विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी होणार निवडणूक
  • सोमवार 10 मार्च ते सोमवार 17 मार्च 2025 पर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया होणार
  • मंगळवार 18 मार्च रोजी होणार अर्जाची छाननी होणार
  • गुरुवार 20 मार्च रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस
  • गुरुवार 27 मार्च रोजी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान
  • रिक्त जागांवर कोणाची नेमणूक होणार, याकडे सर्वांचं लक्ष

विधान परिषद निवडणूक 2024 निकाल

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली. महायुतीने दिलेले सर्व 9 उमेदवार निवडून आले आहेत. महाविकास आघाडीचे 3 पैकी दोन उमेदवार विजयी झाले. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी 26 मतांसह बाजी मारली तर मिलिंद नार्वेकर यांनी विजय मिळवला.

विधानपरिषद निवडणुकीत विजयी होण्यासाठी 23 मतांचा कोटा होता. महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर लढणारे शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. जयंत पाटील हे अनेक वर्षे विधानपरिषदेत आमदार होते.

मागील विधान परिषदेच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाकडून कोणाला संधी?

  • भाजप – पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर
  • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर
  • शिवसेना (एकनाथ शिंदे गट) – कृपाल तुमाने, भावना गवळी
  • शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – मिलिंद नार्वेकर
  • शेकाप (शरद पवार गटाचं समर्थन) – जयंत पाटील
  • काँग्रेस – प्रज्ञा सातव

हेही वाचा – Abu Azmi : औरंगजेब उत्तम प्रशासक, आबू आझमींकडून उदात्तीकरण; एकनाथ शिंदे काय म्हणाले…



Source link

Comments are closed.