सेमीफायनल सामन्यासाठी ऑन-फिल्ड अंपायर्सची नावे जाहीर, थर्ड अंपायर म्हणून मायकेल गॉफची निवड

आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य सामन्यांसाठी अधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. आयसीसीने मैदानावरील पंच, थर्ड अंपायर आणि मॅच रेफ्री यांची नावे जाहीर केली आहेत. स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात (4 मार्च) रोजी दुबई येथे खेळला जाईल. दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड आमनेसामने येतील. हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला जाईल.

दुबईमध्ये होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सेमीफायनल सामन्यासाठी न्यूझीलंडचे क्रिस गॅफनी आणि इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ मैदानावरील पंच असतील. या सामन्यात मायकेल गॉफ थर्ड पंच असतील आणि अँडी पायक्रॉफ्ट मॅच रेफरी असतील.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड हा दुसरा उपांत्य सामना लाहोरमध्ये खेळला जाईल. या सामन्यात मैदानावरील पंच श्रीलंकेचे कुमार धर्मसेना आणि ऑस्ट्रेलियाचे पॉल रीफेल असतील. जोएल विल्सन हे तिसरे पंच असतील, तर रंजन मदुगले हे या सामन्यासाठी सामनाधिकारी असतील.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध 6 विकेट्सने जिंकला. या सामन्यात शुभमन गिलने शतक झळकावले, तर मोहम्मद शमीने 5 विकेट्स घेतल्या. त्यानंतर टीमने पाकिस्तानचा पराभव केला. या सामन्यात विराट कोहलीच्या बॅटने शतक झळकावले. न्यूझीलंडविरुद्धच्या ग्रुप स्टेजच्या अंतिम सामन्यात भारताने 44 धावांनी विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियाचा विचार केला तर त्यांनी गट टप्प्यात फक्त 1 सामना जिंकला. इंग्लंडविरुद्ध पहिला सामना 5 विकेट्सने जिंकल्यानंतर, दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा आणि अफगाणिस्तानविरुद्धचा तिसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या :

दुबई आमचं घर नाही, टीकाकारांना प्रत्युत्तर देताना काय म्हणाला रोहित शर्मा?

रोहित शर्माला ‘जाड’ म्हणण्यावरून वादंग, BJP ची टीका – “राहुल गांधीच अनफिट!”

दुबईत टीम इंडियाला खरच फायदा? रोहित शर्माने दिले खणखणीत उत्तर!

Comments are closed.