दुबईत पावसाचा इशारा! भारत-ऑस्ट्रेलिया उपांत्य सामना रद्द होण्याची शक्यता?

भारतीय संघाने उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात उपांत्य फेरीतील पहिला सामना मंगळवारी (4 मार्च) रोजी होणार आहे. परंतु, (4 मार्च) रोजी दुबईचे हवामान खराब राहणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा उपांत्य सामना मंगळवारी येथे खेळला जाणार असल्याने आपण भारतीयांना दुबईतील हवामानाची चिंता आहे. जर रोहित शर्मा आणि संघाने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणारा हा सामना जिंकला तर स्पर्धेचे अंतिम ठिकाण दुबईमध्ये निश्चित होईल.

टीम इंडियाने त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळले आहेत. रोहित शर्माने प्रत्येक सामन्यात नाणेफेक गमावली पण संघाला सामना जिंकण्यात कोणतीही अडचण आली नाही.

ऑस्ट्रेलिया हा एक मजबूत संघ आहे आणि तो भारताला कडक लढत देईल. दुबईमध्ये सध्या उष्णता आहे, परंतु मंगळवारी हवामान बदलेल. पावसामुळे हा सामना विस्कळीत होऊ शकतो.

हवामान खात्याच्या अहवालानुसार, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या उपांत्य सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊ शकतो. मंगळवारी पावसाची शक्यता 10 टक्के आहे. वारे 27 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे. हवामानातील आर्द्रता 34 टक्क्यांपर्यंत राहील.

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरील खेळपट्टी संथ असेल. मागील सामन्यांमध्येही पाहिल्याप्रमाणे येथे फलंदाजी करणे खूप आव्हानात्मक असेल. मधल्या फळीत चांगली फलंदाजी करणाऱ्या संघाला जिंकण्याची शक्यता जास्त असते. दुबईमध्ये वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकी गोलंदाजांना जास्त मदत मिळेल.

दुबईमध्ये पावसाची शक्यता असल्याने नाणेफेक खूप महत्त्वाची ठरेल. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने गेल्या तीनपैकी 2 सामने जिंकले आहेत.

2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताच्या प्रवासाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी गट टप्प्यातील तिन्ही सामने जिंकले. ऑस्ट्रेलियाने पावसामुळे 3 पैकी 2 सामने गमावले, तर एका सामन्यात त्यांनी इंग्लंडला 5 गडी राखून पराभूत केले.

महत्वाच्या बातम्या :

केकेआरचं नेतृत्व मिळाल्यानंतर रहाणे भावुक! म्हणाला, “ही माझ्यासाठी सन्मानाची….

रिषभ पंतचा जागतिक सन्मान.! ‘लॉरेस कमबॅक ऑफ द इयर’साठी नामांकन

वनडेमध्ये ‘या’ 3 भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध दाखवला दम! आकडेवारी शानदार

Comments are closed.