स्वारगेट प्रकरणातील पीडितेचा विरोध असताना पुरुष डॉक्टरकडून तपासणी, वसंत मोरेंचा गौप्यस्फोट

वासनाट अधिक, सांगा: स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणातील पीडित मुलीचा विरोध असताना पुरुष डॉक्टरांनी तिची तपासणी केली असल्याचा गौप्यस्फोट ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी केलाय. पीडितेची भेट घेतल्यानंतर वसंत मोरेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

तिला सांगितलं सोशल मीडिया पाहू नको – वसंत मोरे

वसंत मोरे म्हणाले, तरुणी म्हणाली होती की, फिमेल डॉक्टरांकडून माझी तपासणी करा. कायद्याने फिमेल डॉक्टरने तिची तपासणी करणं गरजेचं होतं. परंतु तिची तपासणी पुरुष डॉक्टरांनी केली. हे भयानक प्रकरण आहे. एवढा विचित्र प्रकार घडल्यानंतर डॉक्टरांना समजलं नाही. ती सुशिक्षित तरुणी आहे. ती फस्ट्रेट झाली. तिला सांगितलं सोशल मीडिया पाहू नको. त्यानंतर ती शांत झाली.

संमतीने हे लोक म्हणतात, पण तो अत्याचार झाल्यानंतर कलकत्त्याला झालेला प्रकार समोर आला. मी गाडीतून उतरल्यानंतर तो मुलगा राईट साईडला गेला आणि मी डाव्या बाजूला ड्रायव्हर आणि कंडक्टर उभे होते तिथे गेले. त्यांना मी सांगितलं तो मुलगा चाललाय त्याने माझ्यावर अतिप्रसंग केलाय. त्याच्या मागे पळाले पण होते. मात्र, तो तिथून पळून गेला. सगळा घटनाक्रम त्याने सांगितला. त्यानंतर त्यांनी मुलीला सांगितलं जाऊद्या वगैरे म्हणून…असंही मोरेंनी सांगितलं.

तिला मानसिक आधार देण्यापेक्षा तिची चौकशी सुरु आहे

पुढे बोलताना मोरे म्हणाले, स्वारगेट स्थानकावरुन ती तरुणी आऊट गेटने बाहेर पडली. जिथे आपण आऊट गेटने बाहेर पडतो. आपण युटर्न घेऊन शकरशेठ रोडला येतो. त्या कॉर्नरला डाव्या बाजूला उभा होता. तिथे तिने जोरात दरा वाजवून गाडी थांबवली. गाडीतून उतरली. तो मुलगा तिच्यासमोर पळून गेला पण तिच्या मदतीला कोणी आलं नाही. ड्रायव्हर कंडक्टर गाडी काढून एसपी ऑफिसपर्यंत गाडी घेऊन गेले. हा घटनाक्रम विचित्र आहे. तिला मानसिक आधार देण्यापेक्षा तिलाच वाटायला लागलंय की मीच आरोपी आहे. ती पीडिता आहे, तिची चौकशी बंद करा.

इतर महत्त्वाच्या बातम्या

आधी इम्रान हाश्मीसोबत भरभरुन किसिंग सीन, पुढे क्रिकेटच्या ‘या’ माजी किंगसोबत थाटला संसार; अभिनेत्री जणू सौंदर्याची खाण!

Mahadev Munde : मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम

अधिक पाहा..

Comments are closed.