आयर्लंडच्या ब्रिटनला भेट देण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर 4 ते 9 मार्चदरम्यान ब्रिटन आणि आयर्लंडच्या दौऱ्यावर असतील. मंगळवारी ते या देशांच्या दौऱ्यावर रवाना होतील, अशी घोषणा परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी केली. या दौऱ्यात ते आपले ब्रिटिश समकक्ष, परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांच्याशी चर्चा करतील. त्याव्यतिरिक्त इतर प्रमुख व्यक्तींसह भारतीय समुदायाच्या सदस्यांना भेटतील.
भारत आणि ब्रिटनमध्ये एक व्यापक धोरणात्मक भागीदारी असून ती विविध क्षेत्रांमध्ये अधिक मजबूत होत आहे. तसेच भारत आणि आयर्लंडमध्ये सामायिक लोकशाही मूल्ये, सांस्कृतिक संबंध आणि वाढत्या आर्थिक सहकार्यावर आधारित सौहार्दपूर्ण द्विपक्षीय संबंध आहेत. 6-7 मार्च रोजी आयर्लंड दौऱ्यादरम्यान एस जयशंकर हे आयर्लंडचे परराष्ट्रमंत्री सायमन हॅरिस व इतर प्रमुख नेते आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांना भेटतील. या भेटीमुळे भारताचे ब्रिटन आणि आयर्लंड या दोन्ही देशांसोबतचे संबंध आणखी दृढ होतील, असा दावा करण्यात आला आहे.
गेल्या नोव्हेंबरमध्ये रोममध्ये झालेल्या जी-7 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या वेळी जयशंकर आणि ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांची भेट झाली होती. इटलीने आयोजित केलेल्या जी-7 शिखर परिषदेसाठी भारताला पाहुणा देश म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
Comments are closed.