पॅनकार्ड क्लब गैरव्यवहार प्रकरण, ईडीची मुंबई व दिल्लीत चार ठिकाणी छापेमारी

पॅनकार्ड क्लब लि. गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मुंबई व दिल्लीतील चार ठिकाणी छापेमारी केली. कारवाईत संशयीत आरोपींच्या परदेशी मालमत्तांसंबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली.

ईडीने सेबी कायदा 1992 अंतर्गत मे. पॅनकार्ड क्लब लि. आणि इतरांविरोधात ही कारवाई केली. तत्कालीन पॅनकार्ड क्लबचे संचालक दिवंगत सुधीर मोरावळकर यांच्या कुटुंबीयांकडील परदेशातील मालमत्तेसंबंधितील कागदपत्रे जप्त करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मे. पॅनकार्ड क्लब लि. आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहिता, 1860 आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसुरक्षा (वित्तीय आस्थापना) अधिनियम, 1999 (एमपीआयडी) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्या आधारावर ईडी देखील याप्रकरणी तपास करीत आहे. या प्रकरणी 50 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची 4500 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे ईडीचे म्हणणे असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येते.

Comments are closed.