कर्णधारपद, करिअर आणि प्रतिष्ठा… आज सर्व काही पणाला! रोहितच्या नेतृत्वाची कठीण परिक्षा
Champions Trophy 2025; चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या उपांत्य फेरीत आज (04 फेब्रुवारी) भारतीय संघासाठी प्रतिष्ठेचा सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा महत्त्वाचा सामना केवळ अंतिम फेरीत प्रवेशासाठीच नाही, तर रोहित शर्माच्या कर्णधारपदापासून अनेक खेळाडूंच्या कारकिर्दीपर्यंत सर्वकाही पणाला लागले आहे. हा सामना केवळ क्रिकेटपुरता मर्यादित नाही, तर टीम इंडियाची प्रतिष्ठा, रोहित शर्माचे कर्णधारपद आणि अनेक खेळाडूंचे भविष्यातील स्थान पणाला लागले आहे. आज दुपारी 2.30 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा रोमांचक थरार रंगणार आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सेमीफायनल सामन्यामुळे रोहित शर्माचे कर्णधारपद धोक्यात आले आहे. जानेवारीतील वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाला तर, रोहित शर्माने बोर्डाला जवळजवळ स्पष्ट केले होते की ते चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर नवीन कर्णधाराचा विचार करू शकतात. जर आज भारतामध्ये काही बिघाड झाला तर रोहित शर्मा कर्णधारपद गमावेल कारण त्याने टी20 मधून निवृत्ती घेतली आहे आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्याचा फॉर्म चांगला नाही. याशिवाय, त्याची आणि रवींद्र जडेजाची एकदिवसीय कारकीर्दही धोक्यात आहे.
रोहित शर्मा एप्रिलमध्ये 38 वर्षांचा होईल, तर रवींद्र जडेजाने वयाची 36 वर्षे ओलांडली आहेत. जर भारत आज उपांत्य फेरीत हरला तर रोहित आणि जडेजासाठी पुढे कठीण प्रवास आहे. काही सामन्यांमध्ये रोहितचा फॉर्म चांगला आहे, पण जडेजा संघर्ष करत आहे. याशिवाय, नवीन खेळाडूंची फौज तयार आहे. अशा परिस्थितीत, आज चुकीला फार कमी वाव असेल.
यासोबतच ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाची विश्वासार्हताही पणाला लागेल. आयसीसी स्पर्धांमध्ये भारताने गेल्या 23 पैकी 22 सामने जिंकले आहेत. संघाने फक्त एकच सामना गमावला आहे, तो 2023 च्या विश्वचषकाचा अंतिम सामना होता. अशा परिस्थितीत, भारताची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ते पुन्हा ऑस्ट्रेलियाकडून हरतील की त्यांना हरवतील? हे पाहणे रंजक ठरेल.
हेही वाचा-
क्रिकेटविश्वात शोककळा, मुंबईचे दिग्गज फिरकीपटू पद्माकर शिवलकर यांचे निधन
ऑस्ट्रेलियाची मोठी चाल, भारतीय खेळाडूचा संघात समावेश करणार? टीम इंडियाची डोकेदुखी वाढली
IPL 2025: केकेआर कर्णधारांची यादी; रहाणेच्या स्थानाची चर्चा, गंभीरचा विक्रम अद्भुत!
Comments are closed.