अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये रात्री दोन तास बैठक; धनंजय मुंडेही उपस्थित, राजीनामा घेणार?

अवघ्या महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बीड ( Beed) जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता मोठी माहिती समोर येत आहे. या घटनेचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राज्यात जोर धरू लागली आहे. याच दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा देवगीरी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोन तास बैठक झाली आहे, या बैठकीस धनंजय मुंडे उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी त्याचा राजीनामा मागितल्याची चर्चा आहे.

मंत्री धनंजय मुंडे, खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल पटेल हे या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीचा तपशील अद्याप बाहेर आलेला नाही. परंतु धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात ही चर्चा झाल्याचं माध्यमांमधून सांगितलं जात आहे.

दरम्यान, बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष यांची ज्या क्रूरपणे हत्या करण्यात आली त्या घटनेचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. संतोष देशमुख यांना कराड गँगने दिलेल्या मरणयातना पाहून लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी बीडमधील जनतेने आज मंगळवारी बीड जिल्हा बंदची हाक दिली आहे. दरम्यान कुणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन पोलीस अधिक्षक नवनीत कावत यांनी केले आहे.

Santosh Deshmukh संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो पाहून लोकांमध्ये संतापाची लाट, बीड बंदचे केले आवाहन

Comments are closed.