IND vs AUS: रोहित शर्मानं पुन्हा गमावला टाॅस, ऑस्ट्रेलियाचा फलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघाच्या प्लेइंग 11
(IND vs AUS) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा पहिला उपांत्य सामना आज (04 मार्च) मंगळवारी खेळला जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना दुबईमध्ये रंगत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटच्या लीग सामन्यात भारताने न्यूझीलंडला हरवून सेमीफायनलमध्ये धडक मारलेली. दरम्यान आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या देखील भारतीय संघ त्याच (न्यूझीलंविरुद्ध) प्लेइंग इलेव्हन मैदानात उतरला आहे. तर ऑस्ट्रेलियाने संघात एक बदल करण्यात आला आहे. (IND vs AUS Toss updates)
दुखापीमुळे कांगारु संघाचा सलामीवीर फलंदाज मॅथ्यू शाॅट या सामन्यातून बाहेर पडला होता. त्यामुळे त्याच्या जागी संघात आता कूपर कॉनोलीची निवड झाली आहे. तर टीम इंडियामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. संघाबद्दल बोलायचे झाल्यास संघाला लीग सामन्यात तीन सामने खेळावे लागले. पण पावसामुळे संघाचे दोन सामने रद्द झाले. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध एक सामना खेळला आणि तो जिंकला.
दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती
ऑस्ट्रेलिया: कूपर कॉनोली, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), अॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, अॅडम झांपा, तनवीर संघा
दोन्ही संघाच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 151 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 84 सामने जिंकले आहेत, तर भारताने 57 सामने जिंकले आहेत. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर वर्चस्व गाजवले आहे.
हेही वाचा-
“स्वतःची लढाई स्वतःच लढावी….”, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी श्रेयस अय्यरची मोठी प्रतिक्रिया
भारत-ऑस्ट्रेलिया सामना अनिर्णीत? अंतिम फेरीत कोणाला स्थान? जाणून घ्या आयसीसीचा नियम!
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी दुबईच्या खेळपट्टीत मोठा बदल, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या?
Comments are closed.