‘कृष्णा आंधळे जिवंत नाही, त्याची हत्या झाली…’, जितेंद्र आव्हाडांनी केला मोठा दावा, व्हायरल फो

<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;"> <एक शीर्षक ="मुंबई" href ="https://marathi.tezzbuzz.com/news/mumbai" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde Resign) यांनी आज अखेर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh case) हत्येप्रकरणात, धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. त्याचबरोबर या प्रकरणापासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत होती, या प्रकरणानंतर अनेकांना संताप व्यक्त केला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत संताप व्यक्त करत या कुटूंबाला न्याय द्या असं म्हटलं आहे. 

माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, तुम्ही माझी आधीची भाषण काढून बघा. त्या भाषणांमध्ये या सर्व फोटोंचा वर्णन माझ्या भाषणामध्ये आहे. संतोष देशमुख जेव्हा अंतिम घटका मोजत होते, तेव्हा मारणारे नालायक, नराधम, जल्लाद त्यांच्यावरती लघुशंका करत होते. तेव्हा लोकांनी आमच्या टिंगल टवाळी केली. माणसाच्या अंगात इतका क्रूरपणा इथे कुठून आला, आपल्याला सुद्धा एक बहीण आहे, बाप आहे, भाऊ आहे, मुलं आहेत, आपण सर्व संसाराच्या लपेटात असताना आपल्या प्रेमाचा झरा आहे कुठे? हृदय कुठे आहे? हे सर्व दृश्य बघताना राज्यातील जनता देखील आश्चर्यचकित झाली असेल, गुन्हे केल्यानंतर राजश्रय मिळतो. आपल्याला काहीच होणार नाही अशी भीती जेव्हा संपते. तेव्हा असं सगळं सुरू होतं, जेव्हा आपल्याला भीती असते, मला याच्याबद्दल कोणीतरी प्रश्न विचारेल, त्याबद्दलची भीती असते, पण जेव्हा मला केलेल्या कामाबद्दल शाब्बासकी मिळणार आहे असं ध्यानीमनी स्वप्न असतं तेव्हा नराधम असे क्रूर प्रकार करतात असं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. 

जेव्हा संतोष देशमुख यांचे हे फोटो त्यांची मुले बघतील, तेव्हा त्यांना काय वाटेल. माझ्या वडिलांना असं मारलं असं काय वाटेल त्यांना एखादा अपघात बघितल्यानंतर आपल्या डोळ्यासमोरून तो जात नाही. पण, मग हा फोटो डोळ्यासमोरून जाईल असं कसं वाटेल. या फोटोची जी छवी त्या मुलांच्या मनावर राहिल, तेच त्यांना आयुष्यभर घेऊन जगावं लागेल. याचा मानसिक त्रास त्या मुलांना किती होईल याचा विचार कधी केला आहे का असं सवाल ही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. महादेव मुंडे, किशोर फड, बापू अंधारे यांच्या कुटुंबियांना न्याय द्या, असंही त्यांनी म्हटलं आहे. तर कृष्णा आंधळे जिवंत नाही, त्याची हत्या झाली आहे, असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

राजीनाम्यावर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया 

राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पोस्ट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "<एक शीर्षक ="बीड" href ="https://marathi.tezzbuzz.com/bed" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे."

<एच 2 शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;"> <एक शीर्षक ="देवेंद्र फडणवीस" href ="https://marathi.tezzbuzz.com/topic/devendra-fadnavis" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स"> डेवेंद्र फडनाविस आतीचा प्रतिसाद & एनबीएसपी;"मजकूर-संरेखित: न्याय्य;">राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे. आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेला आहे.

Comments are closed.