SEBI च्या माजी प्रमुख माधवी पुरी बुच यांना हायकोर्टाचा दिलासा, FIR दाखल करण्याच्या आदेशाला चार आठवड्यांची स्थगिती

मुंबई शेअर बाजारातील कथित फसवणूक आणि नियामक उल्लंघनाप्रकरणी हिंदुस्थानच्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड (SEBI) च्या माजी अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि इतर अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देणाऱ्या मुंबई सत्र न्यायालयाच्या आदेशाला मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने चार आठवड्यांसाठी स्थगिती दिली आहे. यामुळे माधवी पुरी बुच यांना थोडा दिलासा मिळाला आहे.
कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने चार आठवड्यांसाठी स्थगिती दिली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने असं निरीक्षण नोंदवलं की, ‘सर्व पक्षांचं म्हणणं ऐकल्यानंतर आणि आदेश वाचल्यानंतर, असं दिसतं की न्यायाधीशांनी अधिक तपशीलात न जाता यांत्रिकरित्या आदेश दिला आहे’.
Comments are closed.