भारतीय संघाला फायनल मध्ये पोहोचवू शकतात हे तीन खेळाडू, कोण ते जाणून घ्या एका क्लिकवर
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत उपांत्यफेरीतील आज पहिला सामना दुबईमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया समोरासमोर आहेत. आतापर्यंत टीम इंडियाने स्पर्धेतील सर्व सामने जिंकून खेळामधील त्यांची लय राखली आहे. तसेच ऑस्ट्रेलिया ही स्पर्धेतील एकाही सामन्यात पराभूत झाला नाही. पण पावसामुळे ऑस्ट्रेलियाचे दोन सामने रद्द झाले. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात आतापर्यंत 151 वनडे सामने खेळण्यात आले आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 84 सामने तर भारतीय संघाने 57 सामने जिंकले आहेत. त्यातील 10 सामन्यांचा निर्णय झाला नाही. तसेच भारतीय संघाला फायनल मध्ये हे तीन खेळाडू पोहोचवू शकतात. कोण ते जाणून घेऊया.
वरुण चक्रवर्ती
नशीब आणि भाग्य दोन्ही सोबत असतील तर कोणतीच गोष्ट अवघड नाही. वरूण चक्रवर्ती हे मोठं उदाहरण आहे, ज्याने न्यूझीलंड विरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पदार्पण केलं. त्याच्या पहिल्याच सामन्यात त्याने 5 विकेट्स घेतल्या. दुबईचा खेळपट्टीवर वरूणच्या गोलंदाजीने कहरच केला. आता आजच्या सामन्यात देखील भारतीय संघाला त्याच्याकडून चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा असेल.
विराट कोहली
विराट कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 100 धावांची शतकी खेळी केली. पण नंतर बांगलादेश आणि न्यूझीलंड विरुद्ध तो काही प्रभावी कामगिरी करू शकला नाही. पण विराट हा एक मोठा खेळाडू आहे आणि तो सामना बदलवू शकतो. विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 4 वनडे डावात शतके ठोकली आहेत. विराटने आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 47 वनडे गावात 53.79 च्या सरासरीने 2367 धावा केल्या आहेत. तसेच विराटने त्यादरम्यान 8 शतके आणि 14 अर्धशतके केली आहेत. विराट ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतो.
श्रेयस अय्यर
श्रेयस अय्यर भारतीय संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका नेहमीच साकारत आला आहे. मागच्या 6 वनडे डावात श्रेयसने 4 अर्धशतके केली आहेत. तसेच श्रेयस अय्यर आता चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारतासाठी सगळ्यात जास्त धावा करणारा फलंदाज आहे. त्याने तीन डावात 150 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडेही गोलंदाजांची कमी नाही पण भारताचे फलंदाज सुद्धा ऑस्ट्रेलियाला नमवू शकतात.
हेही वाचा
“स्वतःची लढाई स्वतःच लढावी….”, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी श्रेयस अय्यरची मोठी प्रतिक्रिया
उपांत्य फेरीसाठी भारतीय संघात मोठा फेरबदल! सामन्यापूर्वी रोहित शर्माचा मोठा खुलासा!
Comments are closed.