Uddhav Thackeray asked if anyone was tying Devendra Fadnavis hands while taking action in the Santosh Deshmukh murder case


संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात कुणी बांधतंय का? असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांची हत्या केली होती. या हत्येप्रकरणी सीआयडीने न्यायालयात 1500 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. यातून संतोष देशमुख यांना मारहाण केल्याचे काही फोटो समोर आले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर ‘क्रूर’ हा शब्दही कमी पडेल. फोटो समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी आज धनजंय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात कुणी बांधतंय का? असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. (Uddhav Thackeray asked if anyone was tying Devendra Fadnavis hands while taking action in the Santosh Deshmukh murder case)

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल जे काही बोलायचं होतं, ते शिवसेना ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या आमदारांकडून बोलून झालेलं आहे. परंतु सर्वांना हा प्रश्न पडला आहे की, संतोष देशमुख यांच्या फोटो आणि व्हिडीओ सोमवारी समोर आले, ते सरकारकडे याआधी आले होते की नव्हते? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर पारदर्शी कारभाव करत असतील तर त्यांचं स्वागत आहे. पण पारदर्शी कारभार करताना त्यांचे हात कोणी बांधतंय का? हा देखील प्रश्न आहे. तसेच महाराष्ट्रातील जनतेला या सर्व गोष्टींचा कंटाळा आला आहे. त्यांना त्यांच्या व्यथा सोडवणारं सरकार पाहिजे. एकमेकांच्या व्यथांना पांघरुण घालणारं सरकार महाराष्ट्राच्या जनतेला नको आहे. त्यामुळे चांगलं राज्य घडवण्यासाठी सर्वांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पडल्या पाहिजेत, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Karuna Munde : दोन दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाकीत, आता करुणा मुंडेंचा नवा दावा

देशमुखांचे फोटो समोर आल्यानंतर मुंडेंचा राजीनामा का घेतला नाही?

मुख्यमंत्र्यांकडे संतोष देशमुख यांचे फोटो खूप आधीपासून होते आणि त्यांनी ते दाबून ठेवले होते का? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, या प्रश्नाचं उत्तर स्वत: मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे, कारण त्या गृहमंत्रीसुद्धा आहेत. खरं तर डिसेंबरपासून ही घटना गाजते आहे. धनंजय मुंडे यांनी आज त्यांच्या तब्येतीचं कारण देऊन राजीनामा दिला आहे. मी त्यांच्या तब्येतीबद्दल कोणतंही भाष्य करू इच्छित नाही. पण मी संस्कार पाळणारा व्यक्ती आहे. त्यामुळे मी कोणाच्याही तक्रारीबद्दल अजिबात चेष्टा करणार नाही. मात्र अजित पवार यांनी म्हटलं आहे की, धनंजय मुंडे यांनी नैतिकेच्या आधारावर राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे धनंजय मुंडे म्हणतात तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा दिला आहे, असे म्हणतात. मग मला प्रश्न आहे की, संतोष देशमुख यांचे फोटो आणि व्हिडीओ बाहेर आल्यानंतर सुद्धा त्यांचा राजीनामा का घेतला गेला नाही? याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजं, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

हेही वाचा – मराठी : देशद्रोही पिलावळीला सच्चा मुसलमान देखील…; अबू आझमींच्या वक्तव्यावर शिंदेंचा संताप



Source link

Comments are closed.