Sharad pawar ncp demands lop post to be on rotational basis with congress sena ubt in marathi
मविआतील एक प्रमुख घटक पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाने आता यासंदर्भात वेगळीच मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेले हे पद तीनही पक्षांना विभागून मिळायला हवे.
Leader Of Opposition : मुंबई : राज्यात निवडणुका झाल्या, महायुती चांगलं बहुमत मिळवत पुन्हा सत्तेत आली. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडले आणि आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मात्र, अजूनही महाराष्ट्र विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळालेना नाही. महाराष्ट्रातील विरोधी आघाडी – शिवसेना – ठाकरे गट, राष्ट्रवादी – शरद पवार आणि कॉंग्रेस यांच्या महाविकास आघाडीने अजूनपर्यंत विरोधी पक्षनेतेपदावर औपचारिकरित्या दावा केलेला नाही. मात्र, या मविआतील एक प्रमुख घटक पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाने आता यासंदर्भात वेगळीच मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेले हे पद तीनही पक्षांना विभागून मिळायला हवे. दरम्यान, विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेना ठाकरे गटाने दावा केला असून या पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाचे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आले आहे. (sharad pawar ncp demands lop post to be on rotational basis with congress sena ubt)
राष्ट्रवादी कॉंग्रेस – शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ही मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, विरोधी पक्षनेता पद सर्व घटक पक्षांना अनुक्रमे 18 महिने मिळावे. आमचे म्हणणे आहे की, विधानसभा विरोधी पक्षनेतेपद तीनही पक्षांना आळीपाळीने 18 महिने मिळावे. ज्यामुळे प्रत्येक पक्षाला विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून आम्हाला एकत्र राहायचे आहे. आणि हीच आमची भूमिका असल्याचेही आव्हाड म्हणाले होते.
हेही वाचा – Shivsena UBT : भास्कर जाधवांच्या नावाचे पत्र शिवसेना उबाठाकडून विधिमंडळात सादर
विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. मात्र, अजूनही विरोधी पक्षनेता म्हणून कोणाचीही निवड झालेली नाही. आव्हाड यांचे म्हणणे आहे की, तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेता आपापसात बोलून यासंदर्भातील निर्णय घेतील. तिन्ही पक्षांना समान संधी मिळायला हवी, असे म्हणणाऱ्या आव्हाड यांनी विरोधी पक्षनेतेपदाची पहिली संधी शिवसेना – ठाकरे गटाला मिळायला हवी, असे मान्य केले आहे. विरोधी पक्षांमध्ये सर्वाधिक 20 जागा ठाकरे गटाकडे आहेत.
गेल्याच आठवड्यात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार असल्याचे सांगितले होते. विधानसभेत ठाकरे गटाचे 20 आमदार, कॉंग्रेसचे 16 तर राष्ट्रवादी – शरद पवार गटाचे 10 आमदार आहेत.
आतापर्यंत चालत आलेल्या परंपरेनुसार, विरोधी पक्षनेता पदावर दावा करण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे एकूण सदस्य संख्येच्या (288) किमान 10 टक्के (28) आमदार असणे गरजेचे आहे.
हेही वाचा – Jai Bhawani Jai Shivaji : विधानसभेत घुमले जय भवानी – जय शिवाजीचे नारे, काय घडलं नेमकं
Comments are closed.