दक्षिण आफ्रिकेला हरविण्याची न्यूझीलंडला संधी, लाहोरमध्ये आज रंगणार दुसरा उपांत्य सामना
साखळी फेरीत अपराजित राहिलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ उद्या बुधवारी लाहोरमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य लढतीत न्यूझीलंडशी भिडणार आहे. आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत दक्षिण आफ्रिकेला अद्यापि एकदाही न्यूझीलंडला हरविता आलेले नाही. त्यामुळे विजयरथावर स्वार असलेल्या या संघाला उद्या न्यूझीलंडला हरवून अंतिम फेरीत धडक मारण्याची संधी असेल.
दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंड यांच्यात आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आतापर्यंत 11 वेळा सामना झालेला आहे. यात न्यूझीलंडने 7 वेळा, तर दक्षिण आफ्रिकेने 4 वेळा विजय मिळविलेला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उभय संघ दोनदा भिडले असून, दोघांनीही 1-1 विजय मिळविला आहा. मात्र, ‘आयसीसी’ स्पर्धेच्या बाद फेरीत अद्याप दक्षिण आफ्रिकेला न्यूझीलंडला हरविता आलेले नाही. 2011च्या वन डे वर्ल्ड कपमधील उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला 49 धावांनी हरविले होते, तर 2015मधील वर्ल्ड कपच्या थरारक उपांत्य लढतीतही न्यूझीलंडनेच बाजी मारली होती. त्यामुळे जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ आयसीसी स्पर्धेतील बाद फेरीत न्यूझीलंडविरुद्धची पराभवाची मालिका खंडित करणार काय याकडे तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा असतील.
दक्षिण आफ्रिकेचे रायन रिकल्टन, कर्णधार तेम्बा बावुमा, रॅसी व्हॅन डर डय़ूसेन, एडेन मार्करम हे आघाडीचे फलंदाज फॉर्मात आहेत, शिवाय कगिसो रबाडा, लुंगी एनगिडी, विआन मुल्डर यांनी गोलंदाजीत चमक दाखविलेली आहे. एकूण भट्टी जमलेल्या दक्षिण आफ्रिकेचे न्यूझीलंडला कडवे आव्हान असेल. दुसरीकडे केन विल्यम्सन फॉर्मात परतल्याने न्यूझीलंडला मोठा दिलासा मिळालाय, शिवाय विल यंग, टॉम लॅथम व ग्लेन फिलिप्स हे फलंदाजही फॉर्मात आहेत. कर्णधार मिचेल सॅण्टनर, विल ओ रुर्पे व मॅट हेन्री हे गोलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना रोखण्यात कितपत यशस्वी ठरतात यावर या संघाची मदार असेल.
संभाव्य उभय युनियन
एन दक्षिण आफ्रिका ः टेम्बा बाव्मा (कर्नाधार्ड), रेन रिसिल्टन, रॅसी व्हॅन्सेन, एडन मार्कराम, हेनरी मार्कराम, हेनरी मार्कराम, हेनरी मिलर, केशाविड मिलर, केशाविड मिलर, केशाविड मेलर, कॅसो रणझान, कॅसो रणझान, कासोदाना, कासोदाना.
एन न्यूझीलंड ः विल यंग, रचिन रवींद्र/डेव्हन कॉन्वे, केन विल्यम्सन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सॅण्टनर (कर्णधार), मॅट हेन्री, कायल जेमिसन, विल ओरुर्क.
Comments are closed.