कन्नमवार, टागोरनगरमधील नागरिकांना पायाभूत सुविधा मिळणार, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

विक्रोळीतील कन्नमवार नगर आणि टागोरनगरमधील नागरिकांना पायाभूत सुविधा मिळणार आहेत. येथील मोठय़ा म्हाडा कॉलनीमध्ये लोकसंख्या मोठय़ा प्रमाणावर वाढल्यामुळे अनेक पायाभूत सुविधांचा अभाव होता. मात्र, स्थानिक आमदार सुनील राऊत यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. विक्रोळीकरांच्या समस्या सुटाव्यात यासाठी त्यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

सुनील राऊत यांच्या उपस्थितीत 3 मार्च रोजी दुपारी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचे म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सुनील राऊत यांनी अनेक मुद्दे मांडले. नागरिकांना कशाप्रकारे अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय हे सुनील राऊत यांनी कागदपत्रे आणि पुराव्यानिशी समजावून सांगितले. त्यानंतर संजीव जयस्वाल यांनी लवकरात लवकर सर्व समस्या आणि विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच म्हाडा अधिकाऱयांना याबाबतचे निर्देश दिले.

या प्रस्तावांना मिळाली मंजूरी

n कन्नमवार नगरमधील वाढत्या लोकसंख्येमुळे अपुरी पडणारी पार्ंकग व्यवस्था लक्षात घेऊन वाहनतळ बांधण्यासाठी ग्रुप क्रमांक 7 येथील जागेच्या बाबतीत तसेच टागोरनगरमधील इमारत क्रमांक 54 येथील जागेचा त्यासाठी विचार करण्यात यावा. कन्नमवार नगर येथील पाण्याच्या टाकीजवळील पंप हाऊस एकूण चार जागा वाहनतळासाठी विचाराधीन आहेत.

n कन्नमवार नगर 2 येथील विकास हायस्कूलच्या बाजूच्या मार्पेटसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर मार्पेट बांधण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

n टागोर नगर म्हाडा वसाहतमधील ग्रुप क्रमांक 1 ते 8 बी चाळ क्रमांक 55 ते 408 येथील गटारांची दुरुस्ती किंवा नूतनीकरण करण्याबाबतच्या प्रस्तावाला संजीव जयस्वाल यांनी 6 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

n कन्नमवार नगर-2 येथील संक्रमण शिबीर इमारतीच्या आजूबाजूच्या आवारातील स्टॉलधारकांना कायमस्वरूपी गाळे दिले जाणार असून तेथे 200 ते 250 एकता व्यापारी संघ स्टॉलधारकांनाही कायमस्वरुपी प्रति चौरस फूट 13500 रु. या वाजवी दरानुसार देण्याचे ठरले. त्याला गाळेधारकांनी मान्यता दिली.

n कन्नमवार नगर येथील मागासवर्गीय (31) गृहनिर्माण संस्था पी डब्ल्यू आर-219 या योजनेतून वगळून याबाबच्या नवीन प्रस्तावाबाबत मंत्री संजय शिरसाट यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा झाली असून त्यावर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासनही संजीव जयस्वाल यांनी दिले.

n कन्नमवार नगरमधील कल्याण भवनाच्या बाजूच्या जागेवर म्हाडाच्या माध्यमातून अद्ययावत तरण तलाव बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.

Comments are closed.