/आजी आजोबांनी 14 वर्षांच्या नातीला विकलं,नवऱ्याकडून सतत शरीर सुखाची मागणी,छ.संभाजीनगरमधील घटना
छत्रपती संभाजीनगर गुन्हा:छत्रपती संभाजीनगरच्या शेवगाव तालुक्यात धक्कादायक घटना घडलीय.नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय नातीला लग्नासाठी विकायला काढल्याची घटना घडल्याने संतापाची लाट उसळली आहे . एका कुटुंबाकडून दोन लाख रुपये घेत 25 वर्षीय तरुणांशी 14 वर्षांच्या नातीचे लग्न लावून दिले .शरीर सुखाची मागणी करत नवऱ्याने मुलीला त्रास द्यायला सुरुवात केली .शरीर संबंधांसाठी होणारा त्रास असह्य झाल्याने मुलीने पोलिसांना मदत मागितली .तिच्याकडून ही धक्कादायक घटना उघडकीस आली . पोलिसांना मदतीसाठी याचना केल्यानंतर दामिनी पथकाकडून या मुलीची सुटका करण्यात आली आहे . (Crime News)
छत्रपती संभाजीनगरमध्ये भावकितील महिलेने शरीरसुखाच्या मागणीला नकार दिल्याने तरुणाने तिच्या अंगावरती कटरने वार केल्याची धक्कादायक घटना ताजी असताना छत्रपती संभाजीनगरमधून नववीत शिकत असलेल्या 14 वर्षांच्या मुलीला आजी आजोबांनी लग्नासाठी विकायला काढल्याची संतापजनक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे .
नक्की प्रकरण काय ?
आजी आजोबांनी 14 वर्षांच्या नातीला विकलं .दोन लाख रुपये घेऊन तिचं लग्न लावून दिलं .नवऱ्याकडून सतत शारीरिक संबंधांसाठीचा त्रास असह्य झाल्याने तिने पोलिसांना मदत मागितली त्यानंतर दामिनी पथकाने या मुलीची सुटका केल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या शेवगाव तालुक्यात घडलाय .या घटनेने मोठी खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जातोय . (Crime News)
छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 वर्षांची असताना पीडित मुलीचे वडील वारले .आई विचार न करता लेकीला सोडून गेली .आजी आजोबा व काकालाही 14 वर्षांची मुलगी नको झाली .त्यामुळे आजी-आजोबांनी एका कुटुंबाकडून दोन लाख रुपये घेऊन तिचे लग्न लावून दिले .दोन महिने पतीचा शारीरिक संबंधांसाठी त्रास असेही झाला आणि मुलीने पोलिसांना मदत मागितली . शेवगाव तालुक्यातील नववीत शिकत असलेली ही अल्पवयीन मुलगी तिच्याच कुटुंबाला नकोशी झाली .तिच्या सख्ख्या आजी-आजोबांनी तिला लग्नासाठी विकायला काढले .देवळाली परिसरातील कुटुंबाने मुलीला मागणी घातली .मुलीचा आरोपानुसार आजी-आजोबांनी तिच्या सासरच्यांकडून तिच्या देखा तो दोन लाख रुपये घेतले .1 जानेवारी 2025 रोजी तिचे गावातच 25 वर्षाच्या युवकासोबत लग्न लावून दिले .लग्नानंतर दोन महिन्यात पतीचा शारीरिक संबंध ठेवण्यासाठीचा त्रास असह्य झाला आणि मुलीने पोलिसांना मदत मागितली . यानंतर दामिनी पथकाने या मुलीची सुटका केली आहे .
छत्रपती संभाजीनगरमध्ये संतापजनक घटना
छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) संतापजनक घटना घडली आहे. भावकीतीलच 36 वर्षांच्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली, त्यानंतर 19 वर्षांच्या तरुणाने नकारानंतर तिच्यावरती कटरने वार करत हल्ला केला. त्यामुळे तिला तब्बल 280 टाके घालावे लागले आहेत. अंगावरती झालेल्या भयंकर वेदना सहन करत पिडित महिला एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. अभिषेक तात्याराव नवपुते (वय 19 वर्षे) असं आरोपीचे नाव आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावभर काही घडलंच नाही, अशा आविर्भावात वावरत होता. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा साधा लवलेशही दिसत नव्हता.पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना रविवारी घडली आहे.
हेही वाचा:
शरीर सुखाची मागणी, कटरने वार, गोधडीसारखं अंग शिवण्याची वेळ, 280 टाके छ. संभाजीनगरची हादरवणारी घटना
अधिक पाहा..
Comments are closed.