14 वर्षांच्या नातीचं घेऊन आजी आजोबांनी लावलं लग्न; आता पोलिसांनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले,
छत्रपती संभाजीनगर गुन्हे: छत्रपती संभाजीनगरच्या शेवगाव तालुक्यात आजी आजोबांनी आपल्या 15 वर्षांच्या नातीचं दोन लाख रूपये घेऊन लग्न लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय नातीला लग्नासाठी विकायला काढल्याच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे . एका कुटुंबाकडून दोन लाख रुपये घेत 25 वर्षीय तरुणांशी 14 वर्षांच्या नातीचे लग्न लावून दिले. शरीर सुखाची मागणी करत नवऱ्याने मुलीला त्रास द्यायला सुरुवात केली. शरीर संबंधांमुळे होणारा त्रास असह्य झाल्याने मुलीने पोलिसांना मदत मागितली. त्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलिसांना मदतीसाठी याचना केल्यानंतर दामिनी पथकाकडून या मुलीची सुटका करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती देताना आई वडिल नसलेल्या मुलीला तिच्या आजी आजोबांनी लग्न करून देत दोन लाख रूपये घेतल्याची माहिती दिली आहे, (Crime News) छत्रपती संभाजीनगरमधून नववीत शिकत असलेल्या 14 वर्षांच्या मुलीला आजी आजोबांनी लग्नासाठी विकायला काढल्याची संतापजनक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी काय दिली माहिती?
पोलिसांनी माहिती देताना सांगितलं, हा बालविवाह सातारा येथे झाला. याबाबत कंट्रोल रूमला एक फोन आला होता. त्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो. आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर परिस्थिती वेगळी होती. त्या लहान मुलीचे लग्न झालेलं होतं. एक जानेवारी 2025 ला तिचं लग्न झालं आहे असं तिने सांगितलं. ती 14 वर्ष आणि 11 महिन्यांची आहे. पंधरा वर्षे देखील तिला पूर्ण झालेली नाहीत. तिचे आई-वडील लहानपणी गेले असताना तिच्या आजी आणि आजोबांनी तिला सांभाळलं. घरची परिस्थिती नाजूक आहे असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे आजी आजोबांनी तिचं लवकर लग्न केलं. तिच्या आजी आजोबांनी तिच्या नातेवाईकांमध्ये तिचं लग्न करून दिलं होतं. कायद्याच्या चौकटीत मुलगी 18 वर्षापेक्षा लहान होती, त्यामुळे तिचं लग्न लावून देणे योग्य नव्हतं मुलगी रडत होती, सांगत होती मला तिथे राहायचं नाही असंही तिचं म्हणणं होतं.
तो परिसर ग्रामीण भागात येत होता. आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या दामिनी पथकाचे अधिकारी आहे. त्यानंतर आम्ही हद्दीची परवा न करता त्या मुलीला ग्रामीण पोलीस चिखलठाणा येथे घेऊन आलो. पुढील कारवाई चिखलठाणा पोलीस स्टेशनमध्ये केली. गुन्हे दाखल झाले. त्यानंतर त्या मुलीला बालकल्याण समिती समोर हजर करून तिची राहण्याची आणि पुढची सोय करून दिली. त्या नवरदेवाच्या घरून आजी आजोबांनी दोन लाख रुपये घेतल्याची माहिती देखील मुलींनी दिली असल्याची पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
नक्की प्रकरण काय ?
आजी आजोबांनी 14 वर्षांच्या नातीचं दोन लाख रुपये घेऊन लग्न लावून दिलं. नवऱ्याकडून सतत शारीरिक संबंधांसाठीचा त्रास असह्य झाल्याने तिने पोलिसांना मदत मागितली त्यानंतर दामिनी पथकाने या मुलीची सुटका केल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या शेवगाव तालुक्यात घडला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. (Crime News)
छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 वर्षांची असताना पीडित मुलीचे वडील वारले. आई विचार न करता लेकीला सोडून गेली. आजी आजोबा व काकालाही 14 वर्षांची मुलगी नको झाली. त्यामुळे आजी-आजोबांनी एका कुटुंबाकडून दोन लाख रुपये घेऊन तिचे लग्न लावून दिले. दोन महिने पतीचा शारीरिक संबंधांसाठी त्रास असह्य झाला आणि मुलीने पोलिसांना मदत मागितली. शेवगाव तालुक्यातील नववीत शिकत असलेली ही अल्पवयीन मुलगी तिच्याच कुटुंबाला नकोशी झाली. तिच्या सख्ख्या आजी-आजोबांनी तिला लग्नासाठी विकायला काढले. देवळाली परिसरातील कुटुंबाने मुलीला मागणी घातली. मुलीने दिलेल्या माहितीनुसार आजी-आजोबांनी तिच्या सासरच्यांकडून तिच्या समोर दोन लाख रुपये घेतले. 1 जानेवारी 2025 रोजी तिचे गावातच 25 वर्षाच्या युवकासोबत लग्न लावून दिले. लग्नानंतर दोन महिन्यात पतीचा शारीरिक संबंध ठेवण्यासाठीचा त्रास असह्य झाला आणि मुलीने पोलिसांना मदत मागितली. यानंतर दामिनी पथकाने या मुलीची सुटका केली आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.