भारतीय संघ न्यूझीलंडकडून 25 वर्षांपूर्वीच्या पराभवाचा बदला घेऊ शकेल का?

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर सामना खेळला जाणार आहे. 9 मार्च रोजी दोन्ही संघ स्टेडियमवर समोरासमोर येतील. या आधी जेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारत न्यूझीलंड समोरासमोर आले होते तेव्हा न्यूझीलंड संघाने भारतीय संघाचा पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये विजय मिळवला होता.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पहिल्या उपांत्यफेरी सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा तर न्युझीलंडने साऊथ आफ्रिकेचा पराभव करून अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे. भारत आणि न्यूझीलंड संघ एकाच गटात सामील होते. तसेच साखळी सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव केला होता.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2000 सालातील स्पर्धेत अंतिम सामना केनिया येथे आयोजित करण्यात आला होता. जो सामना न्यूझीलंडने जिंकला होता. भारतीय संघाला अंतिम सामन्यात पराभूत करून चॅम्पियन्स ट्रॉफीचा किताब त्यांनी जिंकला होता. त्यावेळी भारतीय संघाचे कर्णधार सौरव गांगुली होते. तसेच प्लेइंग इलेव्हनमध्ये सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, राहुल द्रविड, अजित आगरकर, अनिल कुंबळे, जहीर खान असे दिग्गज खेळाडू होते.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या त्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 264 धावा केल्या होत्या. कर्णधार गांगुली यांनी 117 धावांची शतकी खेळी केली होती. सचिन तेंडुलकर यांनी 69 धावा केल्या होत्या. दोघांनीही पहिल्या विकेटच्या आधी 141 धावांची भागीदारी केली होती. यानंतर बाकीचे फलंदाज प्रभावी कामगिरी करू शकले नाहीत. त्यानंतर न्युझीलंडने धावांचा पाठलाग करताना संघातील क्रिस केर्न्सने 102 धावा केल्या. न्यूझीलंडने दोन चेंडू शिल्लक असतानाच 4 विकेट्सनी विजय निश्चित केला. टीम इंडियाला उपविजेत्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

भारतीय संघाकडे आता खूप मोठी संधी आहे की, किवी संघाकडून 25 वर्षांपूर्वीच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी. भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईच्या स्टेडियमवर जिंकले आहेत. तसेच न्यूझीलंडने एकच सामना दुबईच्या स्टेडियमवर खेळला ज्यामध्ये भारताने त्यांचा पराभव केला.

तसेच न्युझीलंडकडे एका सामन्याचा दुबईमधील अनुभव आहे. ज्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला पण तेथून भारतीय संघाच्या खेळाडूंचा आणि परिस्थितीचा त्यांना अनुभव आला असेल. या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. दोन्ही संघ 9 मार्च रोजी समोरासमोर येतील.

हेही वाचा

जर असे झाले तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हर! जाणून घ्या ICC चे नियम

चॅम्पियन्स ट्रॉफी वेळापत्रकावर डेव्हिड मिलर नाराज, दुबई प्रवासावर कठोर प्रतिक्रिया!

गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात मतभेद? भारतीय मुख्य प्रशिक्षकाचे स्पष्टीकरण

Comments are closed.