Cm devendra fadnavis reacted to the statement made by former RSS official bhaiyyaji joshi regarding marathi in marathi
भय्याजी जोशी यांच्या या खळबळजनक विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही भैय्याजी जोशी यांच्या विधानाचे पडसाद उमटले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका सभागृहात स्पष्ट केली आहे.
Maharashtra Assembly Session 2025 : मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भय्याजी जोशी यांनी मुंबईतल्या एका कार्यक्रमात मराठी भाषेबाबत वादग्रस्त विधान केले. घाटकोपरची भाषा गुजराती असून मुंबईतील प्रत्येकाला मराठी भाषा यायला हवी, असे नाही, असे विधान भय्याजी जोशी यांनी घाटकोपरमधील एका कार्यक्रमात केले. त्यांच्या या खळबळजनक विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही भैय्याजी जोशी यांच्या विधानाचे पडसाद उमटले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका सभागृहात स्पष्ट केली आहे. (cm devendra fadnavis reacted to the statement made by former RSS official bhaiyyaji joshi regarding Marathi)
“मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही. इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. जसे की मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला गिरगावात हिंदी बोलणारे कमी सापडतील. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक दिसतील. मुंबईत येणाऱ्या व्यक्तीने मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही.” असं वक्तव्य जोशी यांनी मुंबईतील कार्यक्रमात केले होते.
हेही वाचा – Electricity Bill : वीज बिलं आली आणि ती देखील थकबाकीसह, कैलास पाटलांनी थेट पुरावेच दाखवले
भय्याजी जोशी यांच्या या विधानाचे राजकीय पडसाद उमटले आहेत. विधानसभेतही भय्याजी जोशी यांच्या मराठीबाबतच्या विधानावरून विरोधक आक्रमक झाले. मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांबाबत सरकारची भूमिका काय असा सवाल ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली.
भास्कर जाधव यांनी विचारणा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. भय्याजी जोशी यांचे वक्तव्य मी ऐकलेले नाही. त्यामुळे ते ऐकून, त्याच्यावर माहिती घेऊन मी बोलेन. मात्र, याबाबत सरकारची भूमिका पक्की आहे. मुंबईची, महाराष्ट्राची, महाराष्ट्र शासनाची भाषा मराठी आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे. प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे. विशेष म्हणजे माझ्या या वक्तव्याबाबत भय्याजी जोशी यांचेही काही वेगळे मत असेल असे मला वाटत नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तरीही मी शासनाच्या वतीने सांगतो की, मुंबईची, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. इतर भाषांचा इथे सन्मान आहे. दुसऱ्या कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही. कारण जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करु शकतो. त्यामुळे तो सन्मान आहेच. म्हणून शासनाची भूमिका पक्की आहे आणि शासनाची भूमिका मराठी आहे, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.
हेही वाचा – Ambadas Danve : मोहित कंबोज राज्याचा जलसंपदा विभाग चालवतात, दानवेंचा सभागृहात दावा
Comments are closed.