“सेमीफायनलमध्ये ड्रेसिंग रूममध्ये तणाव, पण हार्दिक हसत होता”, अक्षर पटेलनं सांगतली आतली गोष्ट
भारतीय संघाने सलग चौथा सामना जिंकून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला उपांत्य सामना चार विकेट्सने जिंकला. सामन्यात 265 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहलीने 84 धावांची शानदार खेळी खेळली. या धावांचा पाठलाग करताना श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि केएल राहुल यांनीही महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या. सामन्याच्या शेवटी, हार्दिक पांड्याने उच्च दबावाखाली एक शानदार खेळी खेळली. त्याने 28 धावांची जलद खेळी केली. ज्यात त्याने गरज असताना चाैकार षटकार मारले. शेवटच्या षटकांमध्ये हार्दिकच्या खेळीमुळे ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, याव दरम्यान हार्दिक निश्चिंत दिसत होता.
265 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात भारतीय संघ अडचणीत सापडला. हार्दिक पांड्याने 24 चेंडूत 28 धावांची खेळी खेळली, या दरम्यान त्याने तीन षटकार आणि एक चौकार मारला. त्याने अॅडम झंम्पाच्या षटकात सलग दोन चेंडूंवर षटकार मारून सामना भारताच्या नियंत्रणात आणला. हार्दिक जेव्हा क्रीजवर आला तेव्हा भारतीय ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित असलेले सर्वजण घाबरलेले दिसत होते. भारतीय क्रिकेट संघाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल शेवटच्या षटकांच्या रोमांचबद्दल बोलताना दिसत आहेत.
हार्दिक पांड्या म्हणाला, “मी हसत होतो.” म्हणजे, मी दोन षटकार मारण्याचा विचार केला नव्हता. मला माहित होतं की हे कधीही होऊ (2 षटकार मारणे) शकतं. पण मला माहित होतं की षटकार मारल्याने ड्रेसिंग रूममधील खेळाडू तणावात असतील. मी आतून हसत होतो.”
अक्षर म्हणाला, “तू आत (ड्रेसिंग रुम) काय होईल याचा विचार केला नाहीस? आम्ही म्हणात होतो, ‘अरे, हा काय करतोय एक दोन धावा काढायचं सोडून, पण मला माहित होते, मला तुझ्यावर विश्वास होता. मी फक्त माझ्या सभोवतालचे वातावरण अनुभवत होतो.”
पाहा व्हिडिओ-
हेही वाचा-
गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात मतभेद? भारतीय मुख्य प्रशिक्षकाचे स्पष्टीकरण
चॅम्पियन्स ट्रॉफी वेळापत्रकावर डेव्हिड मिलर नाराज, दुबई प्रवासावर कठोर प्रतिक्रिया!
चॅम्पियन्स ट्रॅाफीच्या अंतिम सामन्यात दुबईच्या खेळपट्टीवर कोण मारणार बाजी, फलंदाज की गोलंदाज?
Comments are closed.