Eknath Khadse is angry with School Education Minister Dada Bhuse for not having money to repair schools


राज्यात 14 हजार अनुदानित शाळांपैकी 10 हजार शाळांच्या इमारतींची दूरवस्था झाली असून ते मोडकळीस आल्यासंदर्भातील तारांकित प्रश्न सतिश चव्हाण आणि विक्रम काळे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. यावर दादा भुसे यांनी दूरवस्था झालेल्या शाळांच्या नवीन इमारतींच्या बांधकामासाठी सरकारकडे पैसे नसल्याची माहिती दिली. यानंतर दादा भुसे यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करताना एकनाथ खडसे सरकार दिवाळखोरीत असल्याची टीका केली.

मुंबई : सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून आज (6 मार्च) चौथ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या उत्तरावर संताप व्यक्त केला. राज्यात 14 हजार अनुदानित शाळांपैकी 10 हजार शाळांच्या इमारतींची दूरवस्था झाली असून ते मोडकळीस आल्यासंदर्भातील तारांकित प्रश्न सतिश चव्हाण आणि विक्रम काळे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. यावर दादा भुसे यांनी दूरवस्था झालेल्या शाळांच्या नवीन इमारतींच्या बांधकामासाठी सरकारकडे पैसे नसल्याची माहिती दिली. यानंतर दादा भुसे यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करताना एकनाथ खडसे सरकार दिवाळखोरीत असल्याची टीका केली. तसेच सरकारकडे पैसे नसतील तर संस्थांच्या जमिनी आणि इमारती विकून टाका, असेही त्यांनी म्हटले. (Eknath Khadse is angry with School Education Minister Dada Bhuse for not having money to repair schools)

एकनाथ खडसे म्हणाले की, राज्यभरात अलीकडच्या कालखंडात शिक्षण संस्था चालवायच्या कशा? हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. कारण राज्य सरकारकडून पूर्वीच्या कालखंडात जी मदत मिळत होती, ती आता मिळताना दिसत नाही. 2008 पासून आतापर्यंत शंभर टक्के अनुदान असलेले वेतनेतर अनुदान आतापर्यंत मिळालेले नाही. या गोष्टीला जवळपास पंधरा वर्षे झाली. तसेच शिक्षक भरतीच्या संदर्भात पोर्टलद्वारे माहिती भरण्याची परवानगी आता संस्थेला ठेवलेली नाही. याशिवाय लाइब्रेरियन किंवा लॅब असिस्टंट भरण्याची सुद्धा सरकारने परवानगी दिलेली नाही. शाळांमध्ये शिपाई देखील नाही. अशावेळी शाळेत झाडू कोणी मारायचा? चेअरमनने मारायचा की हेडमास्टरने मारायचा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच सरकारने लॅब असिस्टंटची फक्त एक जागा ठेवली आहे. अशावेळी शाळा चालवणार तरी कशी? शासनाकडे जर पैसे नाही तर अशा गोष्टी करता कशाला? असे संतप्त सवाल उपस्थित करत खडसे यांनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा – Anil Parab : मुंबईचे भाषिक तुकडे पाडण्याचा आरएसएसचा छुपा अजेंडा, अनिल परब कडाडले

पैसे नसतील तर संस्था शासनजमा करून घ्या

एकनाथ खडसे म्हणाले की, सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे आतातरी 10 हजार शाळांच्या इमारतींसाठी अर्थसंपकल्पात तरतूद करा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच सरकारकडे पैसे नाहीत आणि तिजोरीत खणखणाट आहे असे म्हणतात, मग कशाच्या जोरावर वेगवेगळ्या घोषणा जाहीर करता? शाळांची दुरुस्ती नाही, रंगरंगोटी नाही अशा परिस्थितीत शासन दर्जेदार शिक्षणाची अपेक्षा तरी कशी करू शकते? संस्थेचे सगळे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. मग अशा संस्थांना शासनजमा करून घ्या आणि त्यांच्या संस्थेच्या इमारतींना व जागांना पैसे देऊन त्या सगळ्या शाळा चालवा, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली. यावर दादा भुसे यांनी उत्तर दिले. त्यांनी म्हटले की, आपण पोर्टलद्वारे सगळी भरती करत आहोत. तुमच्या भागातील शाळांनाही त्यावर नोंदणी करायला सांगा म्हणजे त्यांना मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन दादा भुसे यांनी यावेळी दिले.

हेही वाचा – Ambadas Danve : मोहित कंबोज राज्याचा जलसंपदा विभाग चालवतात, दानवेंचा सभागृहात दावा



Source link

Comments are closed.