TB रुग्णांसाठी Meropenem इंजेक्शन महानगरपालिका, सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत द्यावीत, सुनील प्रभू यांची मागणी

टीबी रुग्णांसाठी Meropenem नावाचं Injection महानगरपालिका, सरकारी रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करुन द्यावीत. अशा रुग्णांना ही इंजेक्शन मोफत देण्यासाठी सरकारने तात्काळ पावलं उचलावी, अशी मागणी शिवसेना (उद्धवा बाळासाहेब ठाकरे) आमदार सुनील प्रभू यांनी केली. विधानभवनात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

प्रदुषणामुळे लोकांना श्वसनाचे विकार होऊ लागले आहेत. अचानक त्यांच्या पल्स वाढणे कमी होणे, अशा अनेक केसेस गेल्या अनेक दिवसांमध्ये उपनगरांमध्ये झाल्या आहेत. खास करून कांदिवली, मालाड, गोरेगाव, दिंडोशी, जोगेश्वरी या परिसरांमधून माहिती मिळाली आहे. आरोग्य विभागाने अद्यापपर्यंत यावर कोणतीही कारवाई का केली नाही? नेमकं हे कशामुळे होत आहे? प्रदुषणामुळे होत आहे का? टीबीचे प्रमाण लोकांमध्ये वाढलं आहे का? MDR-TB वाढलं आहे? असे प्रश्न सुनील प्रभू यांनी यावेळी उपस्थित केले.

टीबीसाठी सरकारकडून जे उपचार केले जात आहेत. त्याच्यामध्ये MDR-TB झाला खास करून किंवा टीबीचा विशेष प्रकार झाला. माझ्या माहितीप्रमाणे Meropenem हे Injection महानगरपालिका किंवा सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध नाही. हे औषध जर कोणत्याही रुग्णाला घ्यायचं असेल, तर सामाजिक संस्थांच्या शिफारसीमार्फत ते औषध घेतलं जातं. परंतु जर हे औषध संपलं, तर ते औषध रुग्णांच्या नातेवाईकांना विकत घ्यावं लागतं. एका दिवसाला तीन इंजेक्शन घ्यावी लागतात आणि एक हजार रुपयांना हे एक इंजेक्शन आहे. जर इंजेक्शन खासगीरित्या घेतलं तर, महानगर पालिकेच्या रुग्णालयांमध्ये किंवा आरोग्य केंद्रामध्ये इंजेक्शन देण्याची व्यवस्था नाही. संबंधित रुग्णाला प्रायव्हेटली जाऊन इंजेक्शन घ्यायाला तीनशे रुपये द्यावे लागतात. ही परिस्थिती आज टीबीच्या रुग्णांची आहे. याबाबात अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. माझ्या मतदारसंघात अशी केस आहे. त्या मुलीला मी स्वत: इंजेक्शन पुरवली आहेत. परंतु ती इंजेक्शन घेण्यासाठी तिला तीनशे रुपये खर्च कारावा लागतो, असे सुनील प्रभू म्हणाले

सरकारने या सर्व गोष्टींचा साधक बाधक विचार करुन Meropenem नावाचं Injection आहे, ते महानगरपालिका, सरकारी रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करुन द्यावीत. अशा रुग्णांना ही इंजेक्शन मोफत देण्यासाठी सरकारने तात्काळ पावलं उचलावी, अशी आग्रही मागणी सुनील प्रभू यांनी केली आहे.

Comments are closed.