धक्कादायक! मीच या मठाचा पुजारी आणि मालक म्हणत धर्मोपदेशकाला लोखंडी गजाने मारहाण

अलीकडेच संतोष देशमुख यांच्या हत्येचा व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. राज्यात असे अनेक गुन्हे समोर येत आहेत ज्यामध्ये गुन्हेगारांना राजाश्रय मिळत असल्याचं दिसत आहे. यातच आता पंढरपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पंढरपूरमधील सिध्देनकेरी येथील तोफकट्टी संस्थान मठात गेली 36 वर्षापासून राहत असलेल्या धर्मोपदेशक राचोटेश्वर शिवाचार्य स्वामी यांना लोखंडी गजाने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. यात ते गंभीर जखमी झाले आहेत.
मठाच्या वादातून त्यांना मारहाण झाल्याचं समजत आहे. याप्रकरणी राजू लिंगाप्पा कोरे, मंजूनाथ सकलेश कोरे, भिमू सिध्दाप्पा कोरे, प्रमोद रेवाप्पा कोरे, संतोष रामचंद्र कोरे, सिध्दू येसाप्पा कोरे या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिध्दनकेरी येथील तोफकट्टी संस्थान मठात गेली 36 वर्षे मठपती म्हणून राचोटेश्वर स्वामी हे कार्यरत आहेत. येथे सिद्धेश्वर मंदिर देखील आहे. यातच पुजापाठासाठी मठात आलेल्या काही स्थानिकांनी, ‘मीच या मठाचा पुजारी आणि मालक, तुझा येथे काही संबंध नाही, असं सांगत राचोटेश्वर स्वामी यांच्याशी वाद घातला. नंतर त्यांना लोखंडी गजाने मारहाण केली. याप्रकरणी सहा जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Comments are closed.