न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यात भारताच्या विजयाचे सूत्रधार ठरतील का हे 4 खेळाडू?

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. हा सामना रविवारी दुबईच्या स्टेडियमवर होणार आहे. वरूण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या खेळाडूंनी आत्तापर्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. जर हे चार खेळाडू अंतिम सामन्यात चांगली कामगिरी करू शकले, तर न्यूझीलंड संघाचा पराभव नक्कीच होऊ शकतो. जर न्यूझीलंडचा मागच्या सामन्यातील प्रदर्शन पाहिलं तर हा संघ भारताला अंतिम सामन्यात चांगलीच टक्कर देऊ शकतो.

भारतीय संघाने न्यूझीलंडचा साखळी सामन्यात पराभव केला. या सामन्यात वरूणने कमालीची गोलंदाजी केली. त्याने 10 षटकात 42 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या. वरूणची फिरकी न्यूझीलंडच्या फलंदाजांना अडचणीत टाकू शकते. सध्या तो जास्त विकेट घेण्याच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. तसेच मोहम्मद शमी सुद्धा भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावू शकतो. शमीने 4 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या आहेत. अंतिम सामन्यात सुद्धा शमीची कामगिरी महत्त्वाची ठरू शकते.

विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या दोघांनी आतापर्यंत शानदार फलंदाजी केली आहे. कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असताना भारतासाठी त्याने या स्पर्धेत 217 धावा केल्या आहेत. त्यामध्ये त्याने एक शतकही ठोकलं आहे. विराट कोहलीने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कमालीची फलंदाजी केली होती.

विराट हा मोठा खेळाडू आहे, जर रेकॉर्ड पाहायचे झाल्यास तो अंतिम सामन्यात जोरदार कामगिरी करू शकतो. श्रेयस बद्दल बोलायचे झाल्यास तो सध्या चांगलीच कामगिरी करत आहे. श्रेयसचा खेळातील फॉर्म मजबूत आहे. श्रेयसने स्पर्धेमध्ये एकूणच 195 धावा केल्या आहेत आणि अंतिम सामन्यामध्ये तो कमालीची फलंदाजी करू शकतो.

भारताने मागच्या सामन्यात न्यूझीलंडला खराब पद्धतीने पराभूत केले होते. तसेच भारताने पाकिस्तान आणि बांगलादेशचाही चांगलाच धुवा उडवला. तसेच ऑस्ट्रेलियाला सुद्धा भारतीय संघाने पराभूत केले. भारतीय संघाने आतापर्यंत दुबईच्या स्टेडियमवर कमालीचं प्रदर्शन केलं आहे. आता भारतीय संघ अंतिम सामन्यात कसं प्रदर्शन करतो ते पाहणं रंजकतेच असणार आहे.

हेही वाचा

दुबईतील खेळपट्टी भारतासाठी लाभदायक? मोहम्मद शमीने गौतम गंभीरच्या वक्तव्याला दिले उत्तर!

स्टीव स्मिथनंतर केन विलियमसनही क्रिकेटमधून निवृत्ती घेणार ? अफवा की वास्तव जाणून घ्या एका क्लिकवर

विनेश फोगाटने दिली गुड न्यूज, लवकरच आई होणार!

Comments are closed.