The water problem of Thane metropolis will be permanently resolved by completing the Kalu Dam, says eknath shinde in marathi


Maharashtra Assembly Session 2025 : मुंबई : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कळवा, मुंब्रा व दिवा परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहे. काळू धरण पूर्ण होईपर्यंत पर्यायी उपाय योजनांचा अवलंब करून या समस्येवर मात करण्यात येईल. काळू धरण पूर्ण करण्यात येवून ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा, कळवा परिसरातील पाणी टंचाई बाबत सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. (the water problem of Thane metropolis will be permanently resolved by completing the Kalu Dam, says eknath shinde)

लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिल्ली जाणार नाही. ठाणे महापालिका व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंब्रा, कौसा व कळवा भागात प्रतिदिन 130.50 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीपुरवठा पूर्ण दाबाने होण्यासाठी या भागात सहा जलकुंभांची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामध्ये दोन जलकुंभ कार्यान्वित करण्यात आले असून उर्वरित चार जलकुंभ कार्यान्वित होण्यासाठी वितरण जलवाहिनी टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे. पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी रिमोल्डिंग प्रकल्प राबविण्यात येत आहे. यासाठी शासनाने नगरोत्थानमधून 240 कोटी रुपयांची तरतूदही केली आहे.

हेही वाचा – मराठी : मुंबईतील धोकादायक आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देणार, शिंदे यांचे आश्वासन

कळवा, मुंब्रा, दिवा भागासाठी 50 एम.एल.डी ते संपूर्ण ठाणे महानगरासाठी 100 एम.एल.डी पाण्याच्या प्रस्ताव महापालिकेने दिला होता, त्यावर कार्यवाहीचे आदेश महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला दिले आहेत. तसेच एमआयडीसीच्या बारावी धरणातून महानगराला पाण्याची गरज भागवण्यासाठी अतिरिक्त 50 दशलक्ष लिटर पाणी मागणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे करण्यात आली आहे. एमआयडीसी विटावा भागात रात्री 12 ते 5 यावेळी पाणीपुरवठा बंद करते. या भागात पाणीटंचाई दूर करण्यासाठी अतिरिक्त जलवाहिनीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत रात्री 12 ते 5 या कालावधीत पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत संबंधितांना सूचित करण्यात येईल. ठाणे महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर अवैधरित्या नळ जोडण्या घेण्यात आल्या असतील, तर याबाबत तातडीने चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. लक्षवेधी सूचनेच्या चर्चेमध्ये सदस्य रईस शेख, दिलीप लांडे यांनीही सहभाग घेतला.

हेही वाचा – Sudhir Mungantiwar On Karad : मंत्रालयातील वाल्मिक कराड कोण, मुनगंटीवारांच्या सवालामुळे खळबळ



Source link

Comments are closed.