IAS Transfer of 8 officers including Mira Bhayander Miniciple Corporation and other


मुंबई : महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार आल्यापासून अनेकदा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याचे पाहायला मिलेले आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यांत 50 हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून राज्यात पुन्हा एकदा गुरुवारी (6 मार्च) काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यावेळी 8 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी राधाबिनोद अरिबम शर्मा यांची नियक्ती करण्यात आली आहे. ते आधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे संयुक्त महानगर आयुक्त म्हणून काम पाहत होते. (IAS Transfer of 8 officers including Mira Bhayander Miniciple Corporation)

हेही वाचा : Sudhir Mungantiwar On Karad : मंत्रालयातील वाल्मिक कराड कोण, मुनगंटीवारांच्या सवालामुळे खळबळ 

उद्योग संचालनालयाचे अतिरिक्त विकास अधिकारी एम जे प्रदीप चंद्रेन यांची बदली पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी करण्यात आली. तसेच, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक वैदेही रानडे यांच्याकडे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच, छत्रपती संभाजीनगर विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांची छत्रपती संभाजीनगरच्या अल्पसंख्याक विकास आयुक्त पदावर नियुक्त करण्यात आली आहे. तसेच, छत्रपती संभाजीनगरच्या स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांची जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात अली.

तसेच, सोलापूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपीचंद कदम यांची ठाण्याचे अतिरिक्त आदिवासी आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नागपूर विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अर्जुन चिखले यांची मुंबई फी नियामक प्राधिकरणाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे याआधीदेखील एकूण 7 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले होते.



Source link

Comments are closed.