रोहित-विराटचा अनोखा जल्लोष, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर मैदानावर दांडिया..!
यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचा फायनल सामना भारत विरूद्ध न्यूझीलंड संघात खेळला गेला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव केला. भारतीय फिरकीपटूंच्या तगड्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल सामन्यात न्यूझीलंडला धूळ चारून विजेतेपद पटकावले.
या विजयाने संपूर्ण भारत आनंदाने भरून गेला आहे. या विजयासह, क्रिकेटच्या मैदानावर भारतीय स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांची मैत्रीपूर्ण शैली दिसून आली. विजयानंतर, दोन्ही खेळाडूंनी हातात स्टंप घेऊन दांडिया खेळून आनंद साजरा केला.
अनेकदा रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या सेलिब्रेशनचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल सामन्यात, रोहित आणि विराट अनेक वेळा मैदानावर रणनीती बनवताना एकत्र दिसले. कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने फायनल सामन्यात शानदार विजय मिळवत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
इंटरनेटवरील सर्वोत्कृष्ट व्हिडिओ #roko #चॅम्पियन्सस्ट्रॉफी 2025 #Indvsnz pic.twitter.com/vnfoegiatj
– तुषार राजपूत (@tushar_rajput16) 9 मार्च, 2025
महत्वाच्या बातम्या-
75 वर्ष वय असलेल्या सुनिल गावसकरांचा भन्नाट डान्स, पहा व्हिडीओ
तोंडावर पडले! पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 4 वर्षांपूर्वी केलेलं भविष्य, आज सपशेल पडले तोंडावर
संस्कार! मॅच संपल्यावर कोहली पडला ‘या’ क्रिकेटरच्या आईच्या पाया!
Comments are closed.