‘सैराट’ पुन्हा याड लावायला येतोय…

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटातील अजय-अतुल यांच्या गाण्यांनी तसेच आर्ची-परशाच्या जोडीने सर्वांनाच याड लावलं. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला नऊ वर्षे झाली तरी अद्याप ‘सैराट’च्या कमाईचा रेकॉर्ड कोणत्याही मराठी चित्रपटाला ब्रेक करता आला नाही. प्रेक्षकांना आता आर्ची आणि परशाची जोडी पुन्हा मोठय़ा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘नऊ वर्षांनी पुन्हा एकदा सुटणार पिरतीचं वारं, ‘सैराट’ची जादू पुन्हा अनुभवा, आपल्या जवळच्या चित्रपटगृहांत 21 मार्चपासून’ असे म्हणत झी स्टुडिओने या चित्रपटाच्या पुनर्प्रदर्शनाबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

Comments are closed.