महागाई नरमली! किरकोळ महागाई दर 7 महिन्यांच्या निचांकी पातळीवर, रेपो रेट कमी होण्याची शक्यता

किरकोळ महागाई दर: किरकोळ महागाई दरात मोठी घसरण झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाई दर 3.61 टक्क्यांवर आला आहे. जानेवारी महिन्यात हाच महागाई दर 4.31 टक्क्यांवर होता. गेल्या सात महिन्यांच्या निचांकी पातळीवर महागाई दर गेला आहे.  जुलै 2024 मध्ये महागाई दर हा 3.60 टक्के राहिला होता.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, सात महिन्यांच्या निचांकी पातळीवर महागाई दर पुन्हा पोहोचला आहे. महागाई दर 4 टक्क्यांच्या खाली आल्यानं पुन्हा एकदा रेपो रेट कमी होण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे. आरबीआयने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी महागाई दर 4.2 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. रायन्सेस प्रायवेट लिमिटेडचे एमडी आणि सीईओ संजय कुमार यांनी सीपीआय महागाई निर्देशांक 5 टक्क्यांच्या खाली आला आहे, असं म्हटलं. खाद्य पदार्थातील किमती घटल्यानं ही स्थिती पाहायला मिळतेयं. खाद्य पदार्थाच्या किमतीवरील नियंत्रण कायम ठेवून  विक्री  वाढवण्याचा प्रयत्न आहे. किरकोळ महागाई दर 4 टक्क्यांपर्यंत असल्यानं व्याज दरात कपात शक्य असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

किरकोळ महागाई दर मोजण्यासाठी सरकारने 299 प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा समावेश केला आहे. यामध्ये अन्नपदार्थ, कपडे, इंधन, निवासस्थान इत्यादींचा समावेश आहे.केंद्र सरकारचे सांख्यिकी आणि कार्यक्रम  अंमलबजावणी मंत्रालय या गोष्टींच्या किमतींवरील माहिती गोळा करते आणि त्या आधारावर महागाई दराचे आकडे वेळोवेळी सादर करते.हा दर महिन्याला आणि दरवर्षी सादर केला जातो. महागाई वाढण्याची काही प्रमुख कारणे आहेत. त्यामध्ये जर वस्तू आणि सेवेची मागणी वाढल्यास त्याचा परिणाम किंमतीवर होतो आणि किंमत वाढते ती वस्तू महाग होते. एखाद्या वस्तूच्या कच्च्या मालाची किंमत वाढ, कामगार शुल्क इत्यादींमध्ये वाढ झाल्यास किंमत वाढ होते. महागाई दरात नेहमीच वाढ होते असे नाही तर काहीवेळेला दर कमीही होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या:

जानेवारीत महागाईचा दर घटला, एप्रिलमध्ये कर्ज स्वस्त होणार, आरबीआय रेपो रेट पुन्हा घटवण्याची शक्यता

अधिक पाहा..

Comments are closed.