टीम इंडियाच्या माजी अष्टपैलू खेळाडूचे निधन, सुनील गावस्करांनी व्यक्त केला शोक
सय्यद अली अली डेथ न्यूज: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर चाहत्यांकडून सेलिब्रेशन अजूनही सुरु आहे. मात्र, यादरम्यान, क्रिकेट प्रेमींसाठी दुःखद बातमी समोर आलीये. भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू सय्यद आबिद अली यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झालंय. ते त्यांच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी ओळखले जायचे. अली यांनी टीम इंडियासाटी 29 कसोटी सामने खेळले होते. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी सय्यद अली यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, सय्यद आबिद अली यांच्या दुःखद निधनावर सुनील गावसकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आणि म्हणाले, “ही बातमी ऐकून खूप दुःख झाले. अली टीम इंडियासाठी काहीही करण्यासाठी तयार असयचा. तो शेरदिल खेळाडू होता. तो अष्टपैलू असूनही तो मधल्या फळीत फलंदाजी करायचा, पण गरज पडेल तेव्हा सलामीला फलंदाजी करण्यासाठी जात असायचा. त्यांनी अनेक अविश्वसनीय झेलही पकडले होते.
पुढे बोलताना गावस्कर म्हणाले, मला बरोबर आठवत असेल, तर सय्यद आबिद अली यांनी दोनदा कसोटी सामन्याच्या पहिल्या सामन्यावर विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. मी त्यांचे नातेवाईक आणि सर्व जवळच्या लोकांप्रती शोक व्यक्त करतो.
कशी होती सय्यद आबिद अली यांची कारकीर्द
सय्यद आबिद अलीने आपल्या कारकिर्दीत भारतासाठी 29 कसोटी सामने खेळले, ज्यात त्याने 47 बळी घेतले. त्यानी टीम इंडियासाठी फलंदाजी करतही योगदान दिले. त्यांनी कसोटी कारकिर्दीत 6 अर्धशतकांसह 1,018 धावा केल्या. याशिवाय त्याने 5 एकदिवसीय सामन्यात 7 विकेट घेतल्या आणि 93 धावा केल्या. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर संपूर्ण क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
#Yuzvendrachal टीम इंडियाची मॅच सुरू असताना युजवेंद्र आणि आरजे महावश यांचं लिपलॉक किसिंग? ‘तो’ VIDEO व्हायरल #Rjmahvash #फॅक्टचेक https://t.co/nnp7umjxiz
— ABP माझा (@abpmajhatv) मार्च 12, 2025
Jonty Rhodes : जगातील सर्वात बेस्ट फिल्डर कोण? फिल्डिंगमधील बाप माणसाने सांगितलं नावhttps://t.co/ytaqw8ulp6
— ABP माझा (@abpmajhatv) मार्च 12, 2025
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.