श्रीधर फडके @ 75, 31 मार्चला विलेपार्लेत संगीत रजनी

ज्येष्ठ संगीतकार-गायक श्रीधर फडके यांनी 75व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्या निमिताने 31 मार्च रोजी रात्री 8.30 वाजता विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात श्रीधर फडके संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात श्रीधर फडके यांचा भव्य सत्कार पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या अजरामर गाण्यांचा कार्यक्रमदेखील संपन्न होणार आहे.
‘बिग पॅनव्हास एंटरटेन्मेंट’ आणि ‘संवेदना आर्ट्स’ यांनी या कार्यक्रमाचे ‘एक कलाकार एक संध्याकाळ’ या उपक्रमाअंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सत्कारानंतर श्रीधर फडके यांची मुलाखत ज्येष्ठ कवी व लेखक प्रवीण दवणे घेतील. आघाडीचे गायक शिल्पा पुणतांबेकर, मंदार आपटे, नचिकेत देसाई आणि ‘सारेगमप’फेम सुगंधा दाते श्रीधर फडके यांची गाणी सादर करतील. गाण्यांचे निवेदन अनघा मोडक करणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक संवेदना आर्ट्सचे संतोष जोशी आणि बिग पॅनव्हास एंटरटेन्मेंटचे अभिजित सावंत यांनी दिली.
Comments are closed.