उपराष्ट्रपती धनखर यांना एम्समधून सोडण्यात आले
पुढील काही दिवसांपर्यंत पुरेसा आराम करण्याचा सल्ला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना एम्समधून डिस्चार्ज मिळाला आहे. जगदीप धनखड यांना हृदयविकारासंबंधीच्या समस्येमुळे 9 मार्च रोजी भरती करण्यात आले होते असे एम्सच्या अधिकृत वक्तव्यात म्हटले गेले आहे. एम्समध्ये वैद्यकीय पथकाकडून आवश्यक देखभाल करण्यात आल्यावर धनखड यांच्या प्रकृतीत समाधानकारक सुधार झाल्याने बुधवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. पुढील काही दिवसांपर्यंत पुरेसा आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला आहे.
धनखड यांना शनिवारी रात्री छातीत वेदना होऊ लागल्यावर एम्समध्ये भरती करण्यात आले होते. तेथे हृदयविकाराच्या धक्क्याची पुष्टी झाल्यावर त्यांची अँजियोप्लास्टी करण्यात आली. 73 वर्षीय धनखड यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना वैद्यकीय देखरेखीत ठेवण्यात आले होते. एम्सच्या कार्डियोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. राजीव नारंग यांच्या देखरेखीत धनखड यांना कोरोनरी केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी दुपारी एम्समध्ये जात त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तसेच ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली होती. त्यापूर्वी आरोग्यमंत्री जगतप्रकाश न•ा यांनी एम्समध्ये जात त्यांच्या आरोग्याबद्दल विचारपूस केली होती.
Comments are closed.