स्टार खेळाडूने तडकाफडकी घेतली निवृत्ती! चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला शेवटचा सामना, म्हणाला, माझ

महमूदुल्ला यांनी सेवानिवृत्तीची घोषणा केली: चॅम्पियन्स ट्रॉफी संपली आहे आणि टीम इंडिया चॅम्पियन बनली आहे, पण यादरम्यान जगभरातील खेळाडूंची निवृत्ती सुरूच आहे. एकामागून एक खेळाडू क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहेत. आता त्यात आणखी एक नवीन नाव जोडले गेले आहे. तो बांगलादेशचा क्रिकेटपटू महमुदुल्लाह आहे. त्याने निवृत्तीची घोषणा केली. जरी तो फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळत होता, परंतु आता या फॉरमॅटमधूनही निवृत्ती घेतली आहे. यावेळी त्याने आईवडिलांचे विशेषतः सासऱ्यांचे खूप खूप आभार मानले.

महमुदुल्लाहची गणना बांगलादेशच्या स्टार खेळाडूंमध्ये केली जाते. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. महमुदुल्लाहने लिहिले की, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. सर्व संघातील सहकाऱ्यांचे, प्रशिक्षकांचे आणि विशेषतः  चाहत्यांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी नेहमीच पाठिंबा दिला. माझ्या आईवडिलांचे विशेषतः माझ्या सासऱ्यांचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या भावाचे खूप खूप आभार, जो लहानपणापासूनच माझा प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून माझ्यासोबत आहे. प्रत्येक कठीण काळात मला साथ देणाऱ्या माझी पत्नी आणि मुलांचे आभार. लाल आणि हिरव्या जर्सीमध्ये पुन्हा खेळायला मिळणार नाही यांची उणीव जाणवेल. बांगलादेश क्रिकेटला शुभेच्छा.

काही दिवसांपूर्वीच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेशचा प्रवास संपला, तेव्हा मुशफिकुर रहीमने निवृत्तीची घोषणा केली. आता त्यात महमुदुल्लाह हे एक नवीन नाव देखील जोडले गेले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान दोघांचीही कामगिरी फारशी चांगली नव्हती, त्यानंतर त्यांच्यावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये तीन शतके करणारा महमुदुल्लाह हा एकमेव बांगलादेशी खेळाडू आहे, त्यापैकी दोन शतके 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये आली होती.

महमुदुल्लाहची क्रिकेट कारकीर्द

महमुदुल्लाहच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 50 कसोटी सामन्यांमध्ये 2914 धावा केल्या आहेत. यासोबत 239 एकदिवसीय  सामने खेळले आहेत आणि या काळात त्याने 5689 धावा केल्या आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना, महमुदुल्लाहने 141 सामन्यांमध्ये 2444 धावा केल्या आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळताना त्याने चार धावा केल्या. ही त्याची शेवटची आंतरराष्ट्रीय खेळी ठरली आहे. बांगलादेश संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीमधून एकही सामना जिंकता आला नाही.

हे ही वाचा –

Hardik Pandya : धमाकेदार कामगिरीनंतरही ICC ची हार्दिक पांड्यावर कारवाई; नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या

अधिक पाहा..

Comments are closed.