Holi 2025- राज कपूर यांच्या होळी पार्टीत रणबीर कपूर का घाबरला होता? वाचा राज कपूरच्या होळीचे सुरेल किस्से

राज कपूर हे केवळ एक उत्तम चित्रपट निर्माते आणि अभिनेते नव्हते तर ते सर्वोत्तम पार्टी होस्ट म्हणूनही ओळखले जात होते. अनेक वर्षांपासून, कपूर कुटुंबाने आरके स्टुडिओमध्ये भव्य पार्ट्यांचे आयोजन केले होते ज्यात हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या स्टार्सनी हजेरी लावली होती. राज कपूर यांचा नातू रणबीर कपूरनेही त्यांच्या आजोबांच्या प्रतिष्ठित होळी पार्ट्यांबद्दल काही मजेदार किस्से शेअर केले आणि ते त्यांना का घाबरवायचे हे देखील सांगितले.

राज कपूरच्या होळी पार्टीत रणबीर कपूर का घाबरला होता?

बॉलीवुडमध्ये होळी खेळण्याची परंपरा सुरु करण्यासाठी राज कपूर यांचे नाव आजही अग्रस्थानी घेतले जाते. चेंबूरचा आर के स्टुडिओ हा राज कपूर यांच्या होळीसाठी ओळखला जायचा. ही होळी बघण्यासाठी चेंबूर परिसरातील अनेकजण उपस्थित राहायचे. राज कपूर यांची होळी म्हणजे स्टेटसवाली होळी होती. राज कपूरच्या होळीसाठी निमंत्रण आलं म्हणजे, आपण मोठे स्टार आहोत हेच त्याकाळी समीकरण होतं. म्हणूनच राज कपूर आणि आर के स्टुडिओची होळी हे समीकरण हातात हात घालून चालायचं.

नुकतेच काही महिन्यांपूर्वी रणबीर कपूरने आजोबांच्या स्मरणार्थ जुन्या आठवणींना उजाळा देताना, आर के स्टुडिओतील होळीचा एक किस्सा सांगितला. चित्रपट निर्माते राहुल रवैल यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान, रणबीरने आरके स्टुडिओमध्ये राज कपूरच्या प्रसिद्ध होळी पार्टीबद्दल एक महत्त्वाचा किस्सा सांगितला. यामध्ये रणबीर म्हणतो की, “मी खूप लहान होतो, त्यामुळे ते वातावरण माझ्यासाठी खूप भीतीदायक असायचं. होळीची पार्टी म्हणजे कोणीही ओळखता यायचं नाही. एका पार्टीत मी गेलो होतो त्यावेळी सर्व केवळ काळ्या निळ्या रंगानी माखलेले दिसत होते. मुख्य म्हणजे सर्वांना उचलून उचलून रंगाच्या पाण्यात बुडवलं जात होतं.’’

राज कपूर यांच्या होळी पार्टीला केवळ सुपरस्टार किंवा सेलिब्रिटी हजर नसायचे, तर प्रॉडक्शन स्टाफ आणि क्रू मेंबर्सपर्यंत सर्व एकत्र होळीचा आनंद लुटायचे. त्यामुळेच राज कपूर यांची होळी हा केवळ एक सण नव्हता तर तो एकत्र येण्याचा दिवस असायचा. स्टार्सपासून ते कॅमेरामनपर्यंत, सर्वजण एकत्र होळी साजरी करायचे.

Comments are closed.