शिक्षिकेने तपासण्यासाठी आणलेले बारावीचे पेपर घरात जळून खाक, निकालावर परिणाम होण्याची शक्यता

एका शिक्षिकेने बारावीचे पेपर घरी तपासण्यासाठी आणले होते. घरात आग लागल्यावर हे पेपरही जळू खाक झाले आहेत. यामुळे निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

विरारमध्ये एका शिक्षिकेने बारावीचे ओसी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आणल्या होत्या. पण घरात आग लागली आणि या आगीत बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. विरारमधील बोळींज नानभाट येथील गंगूबाई अपार्टमेंट ही धक्कादायक घटना घडली. उत्तरपत्रिका या शाळा आणि कॉलेजमध्येच तपासणे बंधनकारक असतात, असे असताना या शिक्षिकेने या उत्तरपत्रिका घरी आणल्याच कशा हा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच या मुळे ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळाल्या आहेत त्यांच्या निकालावर परिणाम होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments are closed.