युझवेंद्र चहल मिस्ट्री गर्लसोबत दिसला; धनश्री पहिल्यांदाच समोर आली, म्हणाली, मी भावूक…

धनाश्री वर्मा व्हिडिओ व्हायरल: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू युजवेंद्र चहल सध्या चर्चेत आहे. धनश्रीशी घटस्फोटाच्या बातम्या थांबल्या नव्हत्या आणि चहलच्या अफेअरच्या (Yuzvendra Chahal and RJ Mahvash Rumours) चर्चा जरा जास्तच रंगू लागल्या. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात जेव्हा भारत आणि न्यूझीलंडचे संघ एकमेकांशी भिडले होते तेव्हा दोघेही एकत्र दिसले होते. दरम्यान, धनश्री वर्माचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती भावनिक झालेली दिसत आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून धनश्री आणि युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा होत्या. यानंतर हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले. युजवेंद्र चहलनेही एका पोस्टद्वारे स्पष्ट केले होते की, तो आणि धनश्री सध्या एकत्र नाहीत. मात्र, दोघांनीही या मुद्द्यावर उघडपणे स्पष्ट बोलणे टाळले. आता, नवीन डेटिंगच्या चर्चेत धनश्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे ज्यामध्ये ती भावनिक झाली.

खरंतर, ‘बी हॅपी’ चित्रपट पाहिल्यानंतर धनश्री बाहेर आली आणि तिने सांगितले की, मी भावनिक होत आहे. काही वेळातच त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. काही लोक धनश्रीच्या भावनिक वक्तव्याचा संबंध चहलच्या अफेअरच्या अटकळीशी जोडला.


महविश आणि चहल हे दोघेही एका हॉटेलमध्ये एकत्र दिसले, तेव्हा ते प्रसिद्धीच्या झोतात आली. फोटो व्हायरल झाल्यानंतर महविशने त्यावर स्पष्टीकरण दिले आणि अफेअरच्या अफवांना पूर्णविराम देण्यास सांगितले. पण 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोघेही एकत्र बसून बोलत असल्याचे दिसून आले. महविशने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती चहलसोबत भारत-न्यूझीलंड अंतिम सामन्याचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे.

महविशचे वाढले फॉलोअर्स

चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्यानंतर महविश सर्वत्र प्रसिद्ध झाली आहे. चहल सध्या राजस्थान रॉयल्स संघासोबत आयपीएल 2025 च्या तयारीत व्यस्त आहे. दुसरीकडे, चहलमुळे, महविशला फॉलोअर्स वाढले आहे.

हे ही वाचा –

शाहीद आफ्रिदीने धर्म बदलण्यास सांगितलं, वारंवार दबाव टाकला, त्याच्यामुळेच माझं करिअर संपलं; पाकिस्तानी हिंदू क्रिकेटरचा सनसनाटी आरोप

Rahul Dravid IPL 2025 : ओ राही, ओ राही…; राजस्थान रॉयल्सला धक्का, राहुल द्रविडला मोठी दुखापत, चालताही येईना! Photos

अधिक पाहा..

Comments are closed.