रोहित-विराटसह तिघांना मोठा फटका, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड लवकरच भारतीय संघाच्या खेळाडूंशी संबंधित सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट यादी जाहीर करू शकतो. तसेच बोर्ड यावेळी कॉन्ट्रॅक्टमध्ये वेगवेगळे बदल करणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे मोठे नुकसान होऊ शकते. तसेच रविंद्र जडेजासुद्धा या यादीमध्ये सामील आहे. हे तीनही खेळाडू सध्या अ प्लस श्रेणीत समाविष्ट आहेत. पण आता यांची श्रेणी बदलून यांना फक्त अ श्रेणी दिली जाऊ शकते.

रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी20 विश्वकप 2024 नंतर या फॉरमॅट मधून निवृत्ती घेतली होती. बोर्डच्या नियमांनुसार अ प्लस श्रेणीत त्या खेळाडूंना स्थान असते , जे खेळाडू वनडे, कसोटी आणि टी20 या तीनही फॉरमॅटमध्ये खेळतात. पण रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी20 मधून निवृत्ती घेतली असल्याने त्यांच्या श्रेणीत बदल केला जाऊ शकतो. ज्यामुळे त्याचं नुकसान होईल.

बीसीसीआय श्रेणी नुसार प्रत्येक खेळाडूला पगार देते. त्यामुळे आता रोहित, विराट आणि जडेजा यांचे पगारामध्ये नुकसान होऊ शकते. या तीनही खेळाडूंना कमीत कमी 2 करोड रुपयांच नुकसान होऊ शकते. बीसीसीआय अ प्लस श्रेणीतील खेळाडूंना वर्षाला 7 करोड रुपये देते. तसेच फक्त अ श्रेणीतील खेळाडूंना 5 करोड रुपये पगार देते.

बीसीसीआयमधील कॉन्ट्रॅक्टमध्ये अ प्लस श्रेणीत फक्त 4 खेळाडू आहेत. रोहित, विराट, जडेजा आणि जसप्रीत बुमराह. तसेच जर अ श्रेणीबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये सहा खेळाडू आहेत. मोहम्मद शमी , मोहम्मद सिराज, के एल राहुल, शुबमन गिल आणि रविचंद्रन अश्विन या यादीमध्ये सामील आहेत. रिषभ पंत, कुलदीप यादव, यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल आणि सूर्यकुमार यादव बी श्रेणीत सामिल आहेत.

Comments are closed.