Chhaava- ‘छावा’ सिनेमातील अंगावर शहारा आणणारी ती शेवटची काही मिनिटे; संभाजी महाराजांवर अत्याचार झालेली दृश्ये अशी झाली चित्रित!

‘हार गए जो बिन लडे उनपर हैं धिक्कार’… ‘छावा’ सिनेमातील शेवटच्या दहा मिनिटातील संवादांनी प्रेक्षकांच्या मनात चांगलंच घर केलं. खरंतर ‘छावा’ सिनेमातील शेवटची दहा मिनिटं ही अंगावर शहारे आणणारी आहेत. क्रूरकर्मा औरंगजेबाने संभाजी महाराजांवर केलेले अत्याचार डोळ्यांनी बघवत नाहीत. त्यामुळेच ‘छावा’ चित्रपट बघत असताना अनेकांनी हे क्षण बघणं म्हणूनच टाळलेलं आहे. आजही सिनेमागृहात शेवटच्या दहा मिनिटांना काही प्रेक्षक उठून जातात. कारण संभाजी महाराजांवर झालेले क्रूर अत्याचार बघवत नाहीत.

‘छावा’ चित्रपटातील संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशलच्या आत्तापर्यंतच्या करिअरमधील हा चित्रपट फार महत्त्वाचा मानला जातो. नुकताच विकीने विकीने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने चित्रपटाच्या शूटींगचा एक व्हिडीओ टाकलेला आहे. एकूणच त्याने शेवटच्या काही मिनिटांसाठी कशी तयारी केली हेच या व्हिडीओच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे. चित्रपटातील शेवटची दहा मिनिटे अंगावर शहारे आणणारी आहेत. त्यामुळेच प्रेक्षकागृहही एकदम स्तब्ध झालेले असते. याच दृश्यांना चित्रित करण्याचा एक व्हिडीओ आता विकी कौशलने टाकला आहे.

त्याने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘#छवा – द लास्ट स्टँड!’ #बीटीएस.” असे लिहीले असून, यावर विकीच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया भरभरून येत आहेत. त्यात एका चाहत्याने लिहिले – हा चित्रपट नाही तर एक भावना आहे. दुसऱ्याने लिहिले – मेहनत फळाला आली!

‘छावा’ प्रदर्शित होऊन आज एक महिना झाला, तरीही छावाची क्रेझ अजूनही कमी झाली नाही. सध्याच्या घडीला छावाने जगभरातून तब्बल 700 कोटीं पेक्षा जास्त कमाई केली आहे आणि चित्रपटगृहांमध्ये अजूनही गर्दी आहे. मुख्य म्हणजे  या चित्रपटाला आव्हान देण्यासाठी कोणतेही मोठे चित्रपट प्रदर्शित न झाल्याने, चित्रपटाने थिएटरमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

Comments are closed.