कोहली vs गायकवाड: 66 IPL सामन्यांनंतर कोणाचा परफॉर्मन्स जबरदस्त?

टी20 क्रिकेट लीगमधील सर्वात लोकप्रिय स्पर्धा असलेल्या आयपीएलच्या 18व्या आवृत्तीचा कारवां सुरू होण्यास सज्ज आहे. या लीगचा यंदाचा हंगाम 22 मार्चपासून सुरू होणार आहे. ज्यासाठी आता खूप कमी दिवस उरले आहेत. या ब्लॉकबस्टर टी20 लीगसाठी संघ आणि त्यांचे खेळाडू तयारीत व्यस्त आहेत.

आयपीएलचा आणखी एक हंगाम सुरू होणार आहे आणि चाहत्यांच्या नजरा पुन्हा एकदा त्यांच्या आवडत्या खेळाडूंवर खिळल्या आहेत. ज्यामध्ये आरसीबीचे चाहते किंग विराट कोहलीबद्दल उत्सुक आहेत, तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जचे चाहते त्यांचा कर्णधार आणि स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाडबद्दल आशेने सज्ज आहेत. या दोन्ही फलंदाजांनी आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली आहे. जिथे विराट कोहलीचे नाव या लीगमध्ये वर्षानुवर्षे घुमत आहे. तर ऋतुराज गायकवाडचा प्रवास काही वर्षांपूर्वीच सुरू झाला होता.

चेन्नई सुपर किंग्जच्या गायकवाडने आतापर्यंत त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 66 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने खूपच प्रभावी कामगिरी केली आहे. दुसरीकडे, विराट कोहली सध्या आयपीएलमध्ये विक्रमांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. चला तर मग या बातमीद्वारे ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहली यांच्यातील 66 आयपीएल सामन्यांची तुलना करूया आणि पाहूया कोणाचा रेकॉर्ड चांगला आहे.

भारतीय क्रिकेटचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने 2008 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि तो गेल्या 17 वर्षांपासून सतत खेळत आहे . पण जेव्हा आपण 66 आयपीएल सामन्यांनंतर विराट कोहलीच्या आकडेवारीबद्दल बोलायचं तर, तेव्हा किंग कोहलीने 59 डावांमध्ये 27.68 च्या सरासरीने 1384 धावा केल्या होत्या. त्याचा स्ट्राईक रेट 120.03 होता. या काळात त्याने 7 अर्धशतके केलेली.

आता दुसरीकडे, जर आपण ऋतुराज गायकवाडबद्दल बोलयचे झाले, तर त्याने 2020 मध्ये आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली. तेव्हापासून त्याने आतापर्यंत 66 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 65 डावांमध्ये 41.75 च्या प्रभावी सरासरीने आणि 136.86 च्या स्ट्राईक रेटने 2380 धावा केल्या. ज्यामध्ये ऋतुराजने 17 अर्धशतके आणि 2 शतके झळकावली आहेत. या विक्रमावरून हे स्पष्ट होते की 66 आयपीएल सामन्यात ऋतुराज गायकवाड विराट कोहलीपेक्षा खूपच चांगला आहे.

Comments are closed.