कळमकरांना नव्हे, तुम्हाला तिकीट देतो; आमदारकीचं गाजर दाखवून अहिल्यानगरच्या काँग्रेस महिला पदाधि
<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">अहिल्यानगरः अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी काँगेस शरद पवार पक्षाच्या युवक प्रदेश उपाध्यक्षावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळवून देतो म्हणून काँग्रेस पक्षाच्या ओबीसी समन्वयक मंगल भुजबळ यांच्याकडून टोकन म्हणून दिड लाख रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँगेस शरद पवार पक्षाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष बालराजे पाटील यांच्यावर कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत नगर शहर विधानसभेची जागा काँग्रेसला सुटणार असून, तुम्हाला मी तिकीट मिळवून देतो, असे सांगून मंगल भुजबळ यांची फसवणूक केली होती. ऑनलाईन दीड लाखांची देवाण-घेवाण तर ऑफलाइन दहा लाख रुपये दिल्याचा मंगल भुजबळ यांचा आरोप आहे. पैसे देवाण घेवाणाची ऑडिओ क्लिप देखील सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. विधानसभेच्या उमेदवारीसाठी (तिकीटासाठी) बालराजे पाटील याने पक्षाला निधी देण्याच्या बहाण्याने ही फसवणूक केल्याचे मंगल भुजबळ यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
काही महिन्यांपुर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी मंगल भुजबळ या इच्छुक उमेदवार होत्या. मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपात अहिल्यानगर शहराची जागा राष्ट्रवादी शरद पवारांकडे गेली व राष्ट्रवादीने या जागेसाठी माजी महापौर अभिषेक कळमकर यांची उमेदवारी जाहीर केले. पण, नाव जरी जाहीर झाले तरी त्यांना तिकीट मिळणार नाही, काँग्रेसला जागा मिळणार आहे, मात्र, त्यासाठी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फंड द्यावा लागेल, तिकीट निश्चित होण्यासाठी टोकन म्हणून एक लाख रुपये भरावे लागतील, असे सांगून बालराजे पाटील याने आपल्याला एका बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले होते. त्यावर विश्वास ठेवून टप्प्याटप्प्याने एकुण 1.5 लाख रुपये पाठवले होते. परंतू अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने अभिषेक कळमकर यांनाच उमेदवारी दिली होती.
त्यानंतर मंगल भुजबळ यांनी बालराजे पाटील याला दिलेले पैसे परत मागितले, परंतु त्याने टाळाटाळ करण्यास सुरूवात केली, त्यामुळे फसवणूक झाल्याचे मंगल भुजबळ यांनी फिर्यादीत म्हटले आहे. भुजबळ यांनी अखेर 12 मार्च रोजी या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार कोतवाली पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
& nbsp;
Comments are closed.